Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव-(जिमाका) — : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी तसेच कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने उभारी देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी आणि शेतकरीहिताच्या कार्यास अभिवादन म्हणून या योजनेस त्यांचे नाव देण्यात आले आहे. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.

शेतकरी कर्जमुक्तीनंतरही अनेक शेतकरी पुन्हा थकीत कर्जाच्या चक्रात अडकत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यासंदर्भात अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. समितीच्या शिफारशींचा विचार करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी ही योजना लागू राहणार असून ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांनाही योजनेचा लाभ लागू राहणार आहे.

योजनेतील महत्त्वाचा बदल म्हणजे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभाची संधी देण्यात आली आहे. अतिरिक्त थकबाकीची रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिली जाणार असून त्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत उपलब्ध राहणार आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर्जफेडीची शिस्त टिकवून ठेवणे आणि प्रामाणिक कर्जदारांना प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य राहणार आहे. राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या कर्जांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जमीन धारणेची अट लागू राहणार नाही.

या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज असून सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेती क्षेत्राला बळकटी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post
रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo