Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या इतक्या जवळ असलेला एकमेव नेता हरीभाऊ : भक्तीकिशोरदास शास्त्री

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांच्या इतक्या जवळ असलेला एकमेव नेता हरीभाऊ : भक्तीकिशोरदास शास्त्री

कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचारमंचाच्या माध्यमातून माहितीपटाचे विमोचन

कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून स्व. हरीभाउंच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आलेला ९ मिनिटांचा माहितीपट ( डॉक्युमेंटरी ) काल दिनांक १६ जुलै रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आश्रम वढोदा येथे एका छोटेखानी कार्यक्रमात स्व.हरीभाऊ जावळे यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करण्यात आला.कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे कार्यक्रम अल्प उपस्थितीत घेउन फेसबुक वर लाइव्ह करण्यात आला होता.१००० लोक लाइव्ह या कार्यक्रमाला जोडले गेले होते.

 या प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, सुरेशशास्त्री मानेकर बाबा, भक्तिकिशोरदासजी शास्त्री आणि अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी भक्तिकिशोरदास शास्त्रीजी यांनी स्वरचित श्लोकात्मक स्मरण म्हणून एक प्रतिमा अमोल जावळे यांना सप्रेम भेट दिली.कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या माहिती पटाची संकल्पना स्व.हरीभाउंचे जनसंपर्क अधिकारी आणि अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळचे अध्यक्ष संदिप पाटील यांची आहे.

९ मिनिटांच्या माहितीपटात भाऊंचे वैयक्तिक,राजकीय,सामाजीक कारकिर्दीला न्याय देउ शकत नाही तरी हा छोटासा प्रयत्न भाऊंच्या स्मृतीना उजाळा मिळावा आणि भाउंचे कार्य,स्वभाव आणि विचार जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचावे या हेतूनेच हा माहितीपट तयार केल्याचे संदीप पाटील आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

अमोल जावळे
माझ्या वडिलांनी जे संस्कार आणि विचार दिले त्याच मार्गावर चालून त्यांनी केलेली चांगली काम यापुढे कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून पुढे नेणार आहे .या कठीण काळात मला मानसिक आधार आणि बळ दिले ते सर्व संत महंत,पदाधिकारी,लोकप्रतिनिधी कार्यकर्ते,आणि सर्व मित्र परिवार यांच्या मी ऋणात राहू इच्छितो असे नमूद केले.

मानेकर बाबा
भाऊंनी राजकारणा राहून कुठलाही मळ लाऊन घेतला नाही.राजकारणाला अभिप्रेत असे कधीही वागले नाही.एकमेव नेता होता जो संतांच्या उपस्थितीतच आपला वाढदिवस साजरा करायचे.संत शक्योतो अश्या वाढदिवसांना जात नाही मात्र हरीभाऊन कडे सर्व जायचे त्यावरूनच त्यांचे व्यक्तीत्व समजते.जलक्रांतीच काम कुठलेही श्रेय स्वता न घेता केले.भाऊंचे काम पूढेही चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल अस मानेकर बाबांनी नमूद केल.

भक्तीकिशोरदास शास्त्री
भाऊंचा स्वभाव हा अध्यात्मिक होता.व्यस्त असतांनाही ते कायमच कथेत यायचे.माझ्या पाहण्यातील शेतकऱ्यांच्या इतका जवळ असलेला एकमेव नेता होता.या माहितीपटाने भाऊंच्या स्मृतिना उजाळा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जनार्दन हरीजी महाराज

हरीभाऊ सारख्यांच्या अस्तित्वाने माणूस आणि माणुसकी शिल्लक आहे हा विश्वास कायम जिवंत होता.त्यांच्या परिवाराला जेवढे दुख आहे तेवढेच दुख सर्व संप्रदायातील साधू संताना सुद्धा आहे.लोक आमच्या विचाराने प्रभावित होतात पण आम्ही सर्व संत भाऊंच्या स्वभावाने,गुणाने आणि विचाराने प्रभावित होतो.थेंब अमृताची जलक्रांती ही सर्व संकल्पना भाऊंची होती पण भाऊंनी सर्व श्रेय साधू संताना दिल.आम्ही फक्त पाठबळ दिल पण सिंहाचा वाटा फक्त भाऊंचाच होता.स्वताच श्रेय दुसऱ्याला देणारा असा दुसरा नेता अजुन तरी आम्ही पाहिला नाही आणि म्हणूनच कोणी कितीही प्रयत्न केले तरी हरीभाऊ फक्त हरीभाऊच होते.विचार मंचाच्या माध्यमातून शेती,माती,पाणी या विषया संदर्भात हरीभाऊंच्या स्वप्नाप्रमाणे जे जे करता येइल तेते भविष्यातही आपण सगळे मिळून करु हिच त्यांना खरी श्रद्धांजली असेल अस नमूद केल.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिवन महाजन यांनी तर श्लोकाचे वाचन ज्ञानेश्वर घुले यांनी केले.आभार मयुर कोल्हे यांनी मानले.या प्रसंगी नारायण चौधरी,ललित बोंडे,पराग पाटील,चेतन चौधरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज माध्यमिक विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकं वाटप

Next Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने थॅलेसेमीया ग्रस्त बालकांच्या पालकांना “आर्थिक मदतीचे धनादेश” वाटप

Next Post
कृती फाऊंडेशनच्या वतीने थॅलेसेमीया ग्रस्त बालकांच्या पालकांना “आर्थिक मदतीचे धनादेश” वाटप

कृती फाऊंडेशनच्या वतीने थॅलेसेमीया ग्रस्त बालकांच्या पालकांना "आर्थिक मदतीचे धनादेश" वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d