जळगाव – (प्रतिनिधी) – दि. १०/१०/२०२५, शुक्रवार रोजी ज्ञानोदय प्राथमिक व माध्यमिक शाळा, म्हसावद येथे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. दादा सो. पंकजराव भिकनराव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत होमिओपॅथीक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण ३४० विद्यार्थी व गावातील रुग्णांनी लाभ घेतला. शाळकरी मुलांमध्ये आढळणारे सर्दी-खोकला, घशातील संसर्ग, दात-डोळ्यांचे विकार, पोटदुखी, अजीर्ण, अशक्तपणा, त्वचारोग, अॅलर्जी, वाढ न होणे, तसेच मानसिक ताण-तणावाशी संबंधित समस्या यावर तपासणी करण्यात आली.

तसेच प्रौढ रुग्णांसाठी त्वचारोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, मूत्ररोग, पोटाचे विकार, श्वसनाचे आजार, सांधेदुखी तसेच दुर्धर आजार अशा शरीरातील सर्व प्रकारच्या आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोफत होमिओपॅथीक औषधांचे वितरण करण्यात आले.

शिबिरामध्ये होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. सिद्धेश्वर पाटील, व डॉ. अमिता श्रीवास्तव यांनी रुग्णांची तपासणी करून मौल्यवान मार्गदर्शन केले.
तसेच *प्रशिक्षणार्थी प्राची खलसे, देवयानी चव्हाण, हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, फैज खान, भावना नागपुरे, धनश्री तायडे* यांनी सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. नवल परदेशी आकाश सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक श्री समाधान बाविस्कर*व श्री संदीप कांडेकर यांनी मोलाचे प्रयत्न केले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज चे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा व नेत्रचिकित्सक जयेश वाल्हे यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच यापुढेही शाळेतील विद्यार्थ्यांची व गावातील नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्याचे आश्वासन श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज तर्फे देण्यात आले.











