Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात विनाकारण फिरणारी 142 वाहने पोलीसांकडून जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोराना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात 23 मार्च, 2020 पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनच्य काळात संचारबंदी असल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहण्याचा सल्ला शासनाने दिलेला आहे. असे असूनही काही नागरीक व वाहनचालक विनाकारण घराबाहेर फिरत असतात तसेच वाहनेही घेऊन फिरतात. यास पायबंद घालण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलीस विभागास दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस विभागाने जिल्हाभरात धडक मोहिम राबवून जिल्ह्यात 142 वाहने जप्त केली असल्याची माहिती पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) दिलीप पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंमलात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेत विनाकारण वाहनांसह फिरून अडथळा निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा एक भाग म्हणून जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी-132, चारचाकी-3 तर तीनचाकी-7 अशी एकूण 142 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.
जप्तीची कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचा प्रकार व ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत जप्तीची कारवाई केली गेली त्या पोलीस स्टेशनची माहिती पुढीलप्रमाणे आहेत.
एम.आय.डी.सी,जळगाव पोलीस स्टेशन-दुचाकी-40, चारचाकी-1, जळगाव शहर पोलीस स्टेशन दुचाकी-16, जिल्हापेठ पोलीस स्टेशन-दुचाकी-4, तीनचाकी-6, रामानंद पोलीस स्टेशन- तीन चाकी-1, नशिराबाद पोलीस स्टेशन- दुचाकी-12, चोपडा पोलीस स्टेशन- दुचाकी-1, अमळनेर पोलीस स्टेशन-दुचाकी- 2, मारवड पोलीस स्टेशन-दुचाकी-7, पारोळा पोलीस स्टेशन- दुचाकी-9, एरंडोल पोलीस स्टेशन- दुचाकी- 16, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन- दुचाकी-2, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन- दुचाकी-2, भडगाव पोलीस स्टेशन- दुचाकी- 15 कासोदा पोलीस स्टेशन-दुचाकी-1 मेहुणबारे पोलीस स्टेशन-दुचाकी-4, चारचाकी-2. अशाप्रकारे जिल्ह्यात दुचाकी 132, चारचाकी 3 तर तीनचाकी 7 वाहने जप्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी नोंद घेवून विनाकारण वाहनांसह किंवा वाहनांशिवायसुध्दा बाहेर फिरू नये आणि वाहने जप्तीसारखी कारवाई टाळावी. तसेच कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांनी बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावावी-अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे

Next Post

बाजार समितीत भाजीपाल्याची किरकोळ विक्री करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

बाजार समितीत भाजीपाल्याची किरकोळ विक्री करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo