Friday, July 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सत्र न्यायालयाचा निर्णय; प्रेमात लैंगिक अत्याचाराचा अधिकार नाही!

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/06/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
सत्र न्यायालयाचा निर्णय; प्रेमात लैंगिक अत्याचाराचा अधिकार नाही!

पाच-सहा महिन्यांच्या प्रेमसंबंधांनंतर शेजारी राहणाऱ्या तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला.

तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत, म्हणजे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असे स्पष्ट करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. पी. शर्मा यांनी नराधम आरोपी मोहम्मद शमशे आलम मोहम्मद बद्रुलहक शेख याला दोषी ठरवून साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.गोवंडी-शिवाजीनगर येथील आरोपी मोहम्मद शमशे आलम मोहम्मद बद्रुलहक शेख आणि त्याच्या शेजारी राहणारी पीडिता कुंदा (नाव बदलले आहे.) यांचे पाच-सहा महिने प्रेम प्रकरण सुरू होते.

दोघांच्या प्रेमसंबंधाला तरुणीच्या घरच्यांचा विरोध होता. त्या पार्श्वभूमीवर आरोपीने १५ ऑगस्ट २०१७ रोजी बोलायचे आहे, असे सांगून पीडितेला कॉल करून बोलावून घेतले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडिता एका वर्कशॉपमध्ये आली. तिथे आल्यानंतर आरोपीने तिच्या मर्जी विरोधात लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलीसांनी आरोपीला त्याच दिवशी अटक केली. त्यानंतर कुंदाशी विवाह करण्याची तयारी दर्शविल्यानंतर न्यायालयाने फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपीची जामिनावर सुटका केली.खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपी आणि पीडिता या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

दोघांनी विवाह केला असल्याने शिक्षा माफ करावी, अशी विनंती करण्यात आली. मात्र न्यायालयाने घटनेच्या वेळी पीडितेने गैरकृत्याचा प्रतिकार करीत स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी आरोपीवर हल्ला केला आहे. या वरुन आरोपीने तिच्यावर बळजबरी केल्याचे दिसून येते. असे स्पष्ट मत व्यक्त करताना सरकारी सामान्य पुरावे विचारात घेऊन आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

Team Satymev Jayate

Previous Post

महिलांना आर्थिक बळ मिळण्यासाठी सरकार करतंय ‘ही’ मदत….

Next Post

धुळे येथे ‘या’ तारखेला भव्य रोजगार मेळावा….

Next Post
धुळे येथे ‘या’ तारखेला भव्य रोजगार मेळावा….

धुळे येथे 'या' तारखेला भव्य रोजगार मेळावा....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo