Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

चाळीसगाव-(प्रतिनिधी) – 3 डिसेंबर हा दिव्यांग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. समावेशित शिक्षण विभाग,पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर असा दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये करण्यात आले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष सौ प्रतिभा ताई मंगेश चव्हाण व स्वयंदिप संस्थेचे अध्यक्ष मीनाक्षीताई निकम यांच्या हस्ते दिव्यांग शिक्षक श्री चित्ते सर यांना फॉर्म देऊन करण्यात आले.

रक्तदान शिबिराच्या उडघटणाच्या वेळी हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समयी जिल्हा परिषद समावेशित शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक श्री दत्तू पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “थॅलेसेमिया विद्यार्थ्यांना रक्ताची खूप मोठी गरज लागत असून,लॉकडाऊन काळामध्ये या विद्यार्थ्यांना रक्त मिळवण्यास अडचणी निर्माण झाल्या. गेल्या सहा महिन्यापासून थॅलेसेमिया विद्यार्थ्यांना रक्त मिळण्यासाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी थॅलेसेमिया मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करत आहोत त्यातलाच हा एक भाग आहे.” त्यासोबतच मीनाक्षीताई निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की , “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत समाज सध्या सकारात्मक विचार करत असून हि खूप आनंदाची बाब आहे.” या उदघाटन सोहळ्या प्रसंगी मंचावर शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ प्रतिभा मंगेश चव्हाण,स्वयंदिप संस्थेच्या मीनाक्षीताई निकम, गटशिक्षणाधिकारी श्री विलास भोई,विस्तार अधिकारी श्री जितेंद्र महाजन, पंचायत समितीचे ओ एस श्री गांगुर्डे, श्री मालाजंगम सर,जिल्हा परिषदेचे समनव्यक दत्तू पाटील,डाएटच्या समन्वयक सौ सुषमा इंगळे या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज रणदिवे यांनी केले.

त्यानंतर प्रत्यक्ष रक्तदान करायला सुरुवात झाली. रक्तदान करणार्‍यांमध्ये शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. त्यासोबतच पंचायत समितीतील कर्मचारी,शिक्षण विभागातील कर्मचारी यांनीही मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. पंचायत समिती सदस्य श्री सुभाष पाटील यांनीही रक्तदान केले,त्यासोबतच स्वतः दिव्यांग असणारे श्री शंकर चौधरी यांनी व श्री चित्ते सर यांनी उस्फूर्तपणे स्वतःहून रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जीवन सुरभी ब्लड बँक चे डॉक्टर भदाणे, श्री हरीश बारगन,प्रियंका जगताप यांनी मेहनत घेतली. सोबतच चाळीसगाव तालुक्यात रक्तदानाचा महासंकल्प राबवणारे श्री पंकज पाटील व भूषण गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

रक्तदान शिबिराला पंचायत समितीचे सभापती श्री अजय पाटील,गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अजितसिंग पवार  तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य यांनी भेट देऊन सदिच्छा दिल्या.या रक्तदान शिबिराचे आयोजन शिक्षण विभागातील  पंकज रणदिवे, शाम नेरकर, प्रशांत पाटील,रवींद्र पाटील, वीरेंद्र पाटील, प्रशांत लांबट व सुमन पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात ६९ वा स्मृतीदिन साजरा

Next Post

महाआवास अभियानात जळगाव जिल्हा आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post
महाआवास अभियानात जळगाव जिल्हा आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

महाआवास अभियानात जळगाव जिल्हा आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo