Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समितीच्या कामात ऊर्जा बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांची सक्रियता महत्त्वाची

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी यांची प्रतिपादन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जगभरात पोहोचली आहे. समितीच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी शाखांवरती सातत्याने सक्रिय राहणे आवश्यक आहे. समितीच्या आयोजित होणाऱ्या शिबिरांना आणि शाखा भेटींना कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य मानसिक आरोग्य प्रकल्प विभागाचे कार्यवाह डॉ.प्रदीप जोशी यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक रविवारी ९ ऑक्टोंबर रोजी नूतन मराठा महाविद्यालयात घेण्यात आली. या बैठकीला निरीक्षक म्हणून राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी आणि वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी.एस.कट्यारे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. व्ही.आर.पाटील, शहराध्यक्ष प्रा. दिलीप भारंबे यांची उपस्थिती होती. प्रसंगी मानसिक आरोग्य विशेषांक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी प्रस्तावना करीत जिल्ह्यातील २१ शाखांची सद्यस्थिती आणि समितीच्या कामांचा आढावा विषद केला. यानंतर प्रा. डी.एस. कट्ट्यारे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या दिवाळी अंकाबाबतचे नियोजन आणि नागपूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत मांडला. यानंतर जिल्ह्यातील विविध शाखांनी त्यांच्या कामांचा आढावा घेत अहवाल सादर केला.

पुढील काळामध्ये फटाके मुक्त दीपावली अभियान, मानसिक आरोग्य दिन सप्ताहाचे उपक्रम, विवेक वाहिनीचे कार्यक्रम, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची शिबिरे तसेच जिल्ह्यातील शाखा भेटी आणि नवीन शाखा निर्मितीबाबत नियोजन करण्यात आले. प्रसंगी जामनेर शाखेला लीड शाखा घोषित करून त्याबाबतची माहिती मध्यवर्तीला पाठवणार असल्याचे प्रा. कट्यारे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन आणि आभार जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी मानले. बैठकीला जिल्हाभरातील विविध शाखेतील कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी हेमंत सोनवणे, विजय लुल्हे, आर. एस. चौधरी, मीनाक्षी चौधरी, ऋषिकेश शिंदे, आनंद ढिवरे, सुभाष सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम

Next Post

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

Next Post

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo