जळगाव – (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका आदरणीय सौ दिपाली पाटील मॅडम व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ नीलिमा भारंबे मॅडम यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा सादर केली. विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला गाण्यावर ताल धरत विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा पार पाडला. सर्व विद्यार्थ्यांना राजगिराचे लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. नीलिमा भारंबे मॅडम तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ दिपाली पाटील मॅडम, बालक मंदिर मुख्याध्यापिका सौ सीमा जोशी, स्वप्निल पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.










