Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘सहकार भारती’च्या राष्ट्रीय महिलाप्रमुखपदी ‘उद्यमी’च्या रेवती शेंदुर्णीकर यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव, २६ डिसेंबर
येथील उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका रेवती शेंदुर्णीकर यांची लखनौ येथे नुकत्याच झालेल्या सहकार भारतीच्या तीनदिवसीय  अधिवेशनात राष्ट्रीय महिला प्रमुखपदी निवड करण्यात आली.  


या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ आदी उपस्थित होते. यावेळी  देशभरातील सहकार क्षेत्रातील महिला बचत गट तसेच महिलांसाठी कार्य करणार्‍या संघटनांना अनेक  उच्चपदस्थ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यात सर्वश्री भैय्याजी जोशी, सतीश मराठे आदींसह  सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात  उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका रेवती शेंदुर्णीकर यांची राष्ट्रीय महिला प्रमुखपदी निवड करण्यात आली.


सतत कार्यरत
यासंदर्भात ’तरुण भारत’ शी बोलतांना रेवती शेंदुर्णीकर म्हणाल्या की, गेल्या पंचवीस वर्षापासून उद्यमी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मी कार्यरत आहे. त्यामुळे देशभरात अगोदरपासूनच प्रवास सुरू होता. आता  या नवीन पदनियुक्तीमुळे देशभरातील महिलांसाठी काम करण्याची मोठी संधी सहकार भारतीच्या माध्यमातून मिळाली आहे. विविध सहकारी बँका, बचत गटाच्या कामकाज करणार्‍या महिलांना काम करताना येणार्‍या अडचणी, त्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आयोजित करणे, बचत गटाच्या माध्यमातून या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे असे माझ्या  कामाचे स्वरूप असून आता त्याला अधिक गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d