Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

साईगीतांवर भाविकांनी धरला ठेका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मेहरूण येथे साई मंदिराचा १३ वा वर्धापनदिन;“दरबार साईचा” कार्यक्रमाची पालखी सोहळ्याने सांगता

जळगाव : येड बाई लागलं मुरळीला…डोंगर हिरवागार…साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन… अशा विविध भक्तीगीतांवर भाविकांनी “दरबार साईचा” कार्यक्रमात एकच जल्लोष करित नृत्याचा आनंद घेतला. तीनदिवसीय कार्यक्रमाची साई मंदिर, मेहरूण येथे पालखी सोहळ्याने सांगता झाली.

मेहरूण परिसरातील श्रद्धेय श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त “दरबार साईचा” हा सुश्राव्य संगीतमय भक्तिगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. बीड येथील साईगोपाल देशमुख यांनी रात्री सहकाऱ्यांसह कार्यक्रम सादर केला. यामध्ये कालीमातेचा जागर हा सजीव देखावा सादर झाला. ओ काली महाभवानी…गीतावर कलाकाराने केलेले नृत्य भाविकांना स्तंभित करून गेले. साईबाबा यांचा पालखी सोहळा भाविकांना मंत्रमुग्ध करून गेला. तसेच समाधी सोहळा देखील भावपूर्ण झाला. यावेळी साईबाबांच्या जीवनकार्यावरील गीतांनी भाविकांना ठेका धरायला लावला. भाविकांनी साईगीतांवर ताल धरत जल्लोष केला. यावेळी मनपा आयुक्त उदय टेकाळे, माजी महापौर नितीन लढढा, उल्हास बाविस्कर, शरद शहा, सदाशिव जोशी, बी.एम.चौधरी, राजेश जाधव यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमामध्ये मेहरूण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.    

      साईबाबा मंदिराचे तेरावे वर्ष

 मेहरूण परिसरातील प्रसिद्ध साईबाबा मंदिराने एक तप पूर्ण केले असून तेरावा वर्धापनदिन झाला. २००७ साली ११ जोडपे पूजेला बसवून मंदिराची स्थापना करण्यात आली होती. साईबाबा भक्त सुरेश नाईक यांच्या प्रेरणेतून भक्तांनी मंदिर बांधले. याकरिता इंदोर येथील संदीप अग्रवाल यांनी ५ लाख ५० हजाराची मूर्ती दिलेली आहे. दर गुरुवारी संध्याकाळी महाआरती झाल्यावर महाप्रसाद वाटप केला जातो. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह परिसरातील राकेश लाड, बापू पाटील, सिद्धेश घुगे, राकेश वाघ, निलेश वाणी, किशोर सोनवणे, खन्ना महाराज, गोकुळ सोनार, प्रेम देवरे आदी भक्त मंदिराची देखभाल करीत आहेत. वर्धापनदिनानिमित्त साईबाबा मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

२८ जानेवारी १८९९ स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म.

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वॉटर बेल” उपक्रम

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वॉटर बेल” उपक्रम

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वॉटर बेल” उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d