Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामनेर येथे वृक्ष जगविण्याचे हमीपत्र भरून घेत केले वृक्ष रोपांचे मोफत वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

सामनेर ता.पाचोरा(प्रतिनीधी)- येथील सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेकडून जळगाव येथील अर्थ फाउंडेशनच्या सहयोगाने हमीपत्र भरून घेऊन जगविण्याच्या हमीवर बांधावर वृक्ष लागवड करणेसाठी चिंच,मोह,कडुलिंब,बेहळा,बेल या स्वदेशी प्रजातीतील वृक्ष रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
       जागतिक तापमानवाढ व पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन यामुळे जैवविविधता प्रचंड धोक्यात येऊ पाहते आहे त्यामुळे वेळीच सजगता निर्माण झाल्यास त्यात कुठेतरी वेगळी दिशा मिळेल या उद्देशाने शासन व सामाजिक स्तरावर वेळोवेळी वैविध्यपूर्ण पावले उचलली जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून सामनेर येथील सर्वोदय या सामाजिक संस्थेने अर्थ फाउंडेशनच्या सहयोगातुन शेतक-यांना  बांधावर वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक शेतक-यांकडून वृक्ष जगविण्यासाठीचे हमीपत्र भरून घेतले त्यात शेतक-याचे वृक्ष जगविणे बाबतचे प्रतिज्ञापत्र करून घेत संपर्क क्रमांक घेऊन वेळोवेळी त्याबाबत सातत्याने माहिती घेत व प्रत्यक्ष लागवड केलेल्या ठिकाणी भेट देऊन १००टक्के झाड कसे जगेल या उद्देशाने वृक्षाच्या प्रगतीची माहिती घेतली जाणार आहे.त्यामुळे प्रत्येकजण कटाक्षाने वृक्षाच्या रोपाची काळजी घेत ते जगवेल हा संस्थेचा यामागचा प्रधान हेतू आहे.संस्थेने केवळ वृक्ष लागवडीवर भर न देता ती जगलीच पाहिजे यावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याने हमीपत्र भरून घेण्याचा हा अभिनव प्रयोग संस्थेने केला आहे .त्यास सर्वच शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्ही तुम्हास रोपे जगवूनच दाखवू अशी प्रतिज्ञा केली. संस्थेने आजच्या या कार्यक्रमात १११वृक्ष रोपांचे हमीपत्र भरून घेत मोफत वाटप करत सृष्टीच्या मांगल्य बहरण्यासाठी हातभार लावला आहे.विशेष म्हणजे कोणतीही शासकीय मदत नसतांनाही विविध स्तरावरील समन्वयाचा आधार घेत सर्वोदय परिवार अव्याहतपणे आपले हरीत निर्माण उपक्रमाचे काम बारमाही करत आहे हे वाखाणण्याजोगे आहे. यावेळी देविदास पाटील, योगीराज पाटील,सुभाष वाणी,संभाजी पाटील, राजेंद्र पाटील,सोपान साळुंखे ,बाळू पाटील,रशीद काहाकर,प्रशांत पाटील ,यांचेसह १११जणांना वृक्ष रोपे देण्यात आली यासाठी सर्वोदयचे शिवाजीभाऊ,चंद्रकांत साळुंखे,प्रशांत साळुंखे,चेतन सोनकुळ,पंकज साळुंखे, नरेंद्र पाटील यांनी उत्तम नियोजनपूर्वक रोपांचे वाटप केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऑल इंडिया मजलीस ए-इम्तियाज मुजलीस पार्टीने संधी दिल्यास संधीचे सोने करून दाखवीन-मा.विवेक ठाकरे

Next Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक ओझोन दिवस साजरा

Next Post
सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक ओझोन दिवस साजरा

सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक ओझोन दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo