
जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे जामनेर तालुक्यातील सामरोद शिवारातुन विना परवाना अवैध रेती चोरटी वाहतुक करणारे ट्रक्टर तहसिल पथकाने जप्त करून दंडात्मक कार्यवाहीसाठी जामनेर तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

याबाबत तहसिल प्रशासनाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार दिनांक 14 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सामरोद शिवारातील रेणुका माता मंदिराजवळ प्रगणे सामरोद क्षेत्रात गोविंदा इंगळे यांचे ट्रैक्टर तहसिलदार अरुण शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तलाठी पथकाच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात आली.

असून या मोहिमेत जामनेर तलाठी साळुकें साहेब, राठोड़ साहेब ,कोतवाल कल्यान सिंग पाटील यांच्या पथकाने ट्रक्टर वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले. एकनाथ काकडे यांचे स्वत: मालकिचे ट्रक्टर असता याबाबत विचारणा केली गेली वाहनचालक नितीन भिल व गोविंदा इंगळे हे (राहणार सामरोद तालुका जामनेर ) सामरोद येथील एकनाथ काकडे यांचे मालकीच्या ट्रक्टर आहे असे सांगितले त्याला विचारले असता
वाळुचा परवाना नसल्याचे सांगीतले.

यावेळी ट्रक्टर वाहनात विनापरवाना वाळु 1 ब्रास वाळुची वाहतुक करतांना दिसुन आले म्हणुन तहसिल पथकाने कार्यवाही करीत हे ट्रक्टर ट्राली पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी ताब्यात घेवुन जामनेर तहसिल कार्यालयात जमा केले आहे. ट्रक्टर धारक हे ग्राम पंचायत सदस्य असुन पदाचा ग़ैर वापर करित आहे.











