Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना आदेश

लॉकडाऊन काळात ४०९ सायबर गुन्हे दाखल; २१८ जणांना अटक

मुंबई, दि.२३: लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागने  कडक कारवाई करावी असे आदेश दिले असून लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०९ गुन्हे दाखल झाले. तसेच  २१४ व्यक्तींना अटक केली आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Maha Info Corona Website

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर  समन्वय साधून काम करीत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशलमीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.    महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०९ गुन्ह्यांची (ज्यापैकी २३ N.C आहेत) नोंद २२ मे २०२० पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७२ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टीकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १९ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१८ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात  यश आले आहे.

औरंगाबाद

औरंगाबाद सायबर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यातील नोंद झालेला हा पहिला गुन्हा आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोनाग्रस्त रुग्णांबद्दल चुकीची माहिती व अफवा पसरविणारे पोस्ट व्हाट्सॲपवरून पोस्ट केल्या  त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये अफवा पसरून संभ्रमनिर्माण झाला, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

केवळ ॲडमिन

सध्या लॉकडाउनच्या काळात बऱ्याच व्हाट्सअँप पोस्ट्स मधून अफवा, चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. सर्व नागरिकांना महाराष्ट्र सायबर परत एकदा विनंती करते अश्या फ़ॉरवर्ड मेसेजेसवर अंध विश्वास ठेवू नका. सर्व व्हाट्सअँप ग्रुप ऍडमिन्स ,ग्रुप निर्माते (owners )यांच्यावर विशेष जबाबदारी आहे कि, या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात आपल्या व्हाट्सअँप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या बातम्या ,खोट्या बातम्या किंवा माहिती, अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्या. जर कोणी ग्रुप मेंबर तुम्ही सांगूनसुद्धा ऐकत नसेल तर सदर व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाका. ग्रुप settings काही काळाकरिता ‘only admins ‘ करा . एखादी खोटी बातमी किंवा चुकीची माहिती किंवा त्या प्रकारच्या पोस्ट्स असतील तर त्या विरुद्ध नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा व सदर माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) द्या .

केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका. असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

Next Post

वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण – वनमंत्री संजय राठोड

Next Post
वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण – वनमंत्री संजय राठोड

वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण – वनमंत्री संजय राठोड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo