Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महिला स्कूटर रॅली अत्यंत थाटात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज शहरात मोठ्या थाटात महिला स्कूटर रँलीचे आयोजन करण्यात आले होते. या महिला स्कूटर रॅलीला शहरातील महिलांनी महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. ५०० स्कूटर व मोटरसायकल वर असलेल्या महिलांबरोबर मुस्लिम महिलांचा सहभाग या रँलीच वैशिष्ट होत. संपूर्ण काव्यरत्नावली चौक व रस्ते भगव्या फेटयानी झगमगत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंगणघाट मधील घटनेचा निषेध करत, श्रद्धांजली वाहण्यात आली. महापौर भारतीताई सोनवणे यांनी यापुढे महिला अत्याचार सहन करणार नाही अशी शपथ सगळ्या महिलांना दिली. यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर, कैलास सोनवणे,  शिवमती सूचिता हाडा, शिवमती भारतीताई सोनवणे, शिवमती  सुचिता पाटील, शिवमती मंगलाताई पाटील, या मान्यवरांनी रॅलीला झेंडा दाखवत रॅलीची सुरुवात केली. जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमले, भगवा फेटा  आणि शिवरायांच्या जयजयकाराने जळगाव शहर शिवमय झाले होते. ठिक ठिकाणी या रॅलीचे स्वागत पुष्पवृष्टी ने शहरातील विविध चौकांमध्ये विविध संस्थांनी केले.  काव्यरत्नावली चौकातून निघालेली ही रॅली नेहरू चौक,  टावर चौक, असा फेरफटका मारत नेरी नाका मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार व फुलांचे फुल अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती समितीचे प्रमुख पुरुषोत्तम चौधरी, सुरेंद्र पाटील,  सुरेश भाऊसाहेब पाटील, सुमित पाटील, होरिलसिंग राजपूत, लिलाधर तायडे, भरत कर्डिले, फहीम पटेल, समीर जाधव, चेतन पाटील, संजय सोनवणे आदि लोकांनी आयोजनाचे प्रयत्न केले तर या रॅलीचे नेतृत्व सचिव मनपा शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी केले . या रॅली मुळे शिवजयंती उत्सवाची दमदार सुरुवात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने केली आहे. उद्या सकाळी दहा वाजता पर्यावरण पूर्वक शिवजयंती या संकल्पनेची सुरुवात आकाशवाणी चौकात प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, भारतीताई सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वच्छता व पर्यावरण या संकल्पनेच्या आधारे यावर्षी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वयाच्या २०व्या वर्षी ज्या गावात भीक मागितली, आज तिथेच सन्मानित व्हायला आले म्हणून कॉलर टाईट आहे – सिंधुताई सपकाळ

Next Post

रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

Next Post
रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d