Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हंगामा प्‍ले वर नवीन हॉरर-कॉमेडी शो भूताटलेला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव २९ जून २०२०: हंगामा डिजिटल मीडियाचे मालकीहक्‍क असलेले आघाडीचे व्हिडिओ ऑन डिमांड व्‍यासपीठ हंगामा प्‍ले ने आज मराठी व हिंदी भाषेमध्‍ये नवीन हंगामा ओरिजिनल शो भूताटलेला सादर केला. हा हॉरर-कॉमेडी शो रायबाच्‍या अवतीभोवती फिरतो, ज्‍याचा लवकरच विवाह होणार आहे. विवाहासाठी एक आठवडा असताना त्‍याचा सामना एका भूताशी होतो. यामुळे तो अशा स्थितीमध्‍ये अडकून जातो, जी त्‍याच्‍या नियंत्रणाबाहेर जाते आणि त्‍याच्‍या जीवनात गमतीदार गोंधळ निर्माण होतो. या शोमध्‍ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार प्रियदर्शन जाधव, सुरभी हांडे आणि सायली पाटील आहेत. हंगामा डिजिटल मीडियासोबत सहयोगाने कॅफेमराठीची निर्मिती असलेला शो भूताटलेला चे लेखन अभिनेता-लेखक योगेश शिरसाट यांनी केले असून राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्‍दर्शन केले आहे.

या शोबाबत बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्‍हणाले भूताटलेला च्‍या कथानकामध्‍ये हॉरर व विनोदाचे सुरेख संयोजन आहे आणि हे कथानक विलक्षण व मनोरंजनपूर्ण आहे. आमचा वर्षाखेरपर्यंत विविध भाषा, शैली व स्‍वरूपांमध्‍ये १२ ते १४ ओरिजिनल शोज प्रदर्शित करत आमची लायब्ररी प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे.

भूताटलेला’सह डिजिटल पदार्पण करत असलेला प्रियदर्शन जाधव म्‍हणाला, पुन्‍हा एकदा शिवाजीसोबत काम करण्‍याचा चांगला अनुभव राहिला. या शोने मला माझ्या अभिनयासंदर्भात प्रयोग करण्‍याची मुभा दिली आणि मला डिजिटल विश्‍वामधील सर्वोत्तम पदार्पणासाठी यापेक्षा अधिक चांगली संधी मिळाली नसती. शोमधील माझी भूमिका दुविधेचा सामना करते आणि भयानक स्थितीप्रती त्‍याची प्रतिक्रिया खरेतर अत्‍यंत विनोदी आहे. मला विश्‍वास आहे की, प्रेक्षकांना माझी भूमिका व शो खूप आवडेल.

आजपासून सुरू होणारा हा शो स्ट्रिमिंगसाठी हंगामाचे व्हिडिओ ऑन डिमांड व्‍यासपीठ हंगामा प्‍लेवर उपलब्‍ध असेल. भूताटलेला वोडाफोन प्‍ले, आयडिया मूव्‍हीज अॅण्‍ड टीव्‍ही, एअरटेल एक्‍स्‍ट्रीम अॅप, अॅमेझॉन फायर टीव्‍ही स्टिक, टाटा स्‍काय बिंज, एमएक्‍स प्‍लेअर, सोनीलिव्‍ह आणि अँड्रॉईड टीव्‍हीवरील हंगामा प्‍लेच्‍या माध्‍यमातून स्ट्रिमिंगसाठी उपलब्‍ध असेल. तसेच हंगामाचा शाओमीसोबतचा सहयोग ग्राहकांना मी टीव्‍हीवरील हंगामा प्‍लेच्‍या माध्‍यमातून शो पाहण्‍याची सुविधा देईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिलासा दायक वृृत्त:भडगांव शहरासह तालुक्यातीत ३७ रुग्ण कोरोना मुक्त-आ.किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांना डिस्चार्ज

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo