Monday, January 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हर्षवर्धन पाटील यांचा उद्या भाजपात प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
हर्षवर्धन पाटील यांचा उद्या भाजपात प्रवेश

इंदापूर-राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ व दिग्गज नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील उद्या, बुधवारी दुपारी 3 वाजता मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित असणार आहेत.
इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. मागील विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भारणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांचा होता. आघाडीच्या जागा वाटपातही या जागेवर चर्चा सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. लोकसभेला आम्हाला मदत करा विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला विश्वासघात गेला असे म्हणत यांनी हल्लाबोल केला होता. आत्तापर्यंत आपण संयमाने वागलो मात्र यापुढील काळात आक्रमकपणा बघाच असा इशारा देत भाजप प्रवेशाचे संकेत मेळाव्यातच दिले होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.
इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग तीन वेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. युती सरकारच्या काळात ते मंत्रिपदी होते. त्यानंतर राज्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्येही 14 वर्ष मंत्रिपदावर होते. हर्षवर्धन पाटील यांनी सहा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आर्थिक मंदीचा फटका;नोकरी मिळणे कठीण

Next Post

मोहरम निमित्त हिंदु-मुस्लिम एकतेच दर्शन

Next Post

मोहरम निमित्त हिंदु-मुस्लिम एकतेच दर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d