Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हेल्प-फ़ेअर ३ मध्ये नाव नोंदणीसाठी संस्थांना आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

संस्थांचे सेवाकार्य समाजापुढे आणण्याची सुवर्णसंधी 

 जळगाव – (प्रतिनिधी) – समाजातील गरजू, वंचित, उपेक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या, त्यांना तगण्यातून जगण्याकडे नेणाऱ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या सेवाभावी संस्थांसाठी आणि सेवाकार्य करणाऱ्या सेवामहर्षींसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मल्हार हेल्प-फेअरचे आयोजन १५ ते १७ फेब्रुवारी २०२० दरम्यान सागर पार्क, जळगाव येथेकरण्यात आले आहे.  

लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या हेल्प-फेअरमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, दिव्यांग, मुक्या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या आणि त्या प्रमाणेच अश्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आमंत्रित करण्यात येत असते. या संथांना येथे विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतात. त्याचप्रमाणे त्यांच्या भोजनाची व बाहेरगावहून आलेल्या संस्था चालकांच्या राहण्याची व्यवस्था देखील हेल्प-फेअर टीम कडून करण्यात येते. हेल्प-फेअरच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात अनेक संस्थांना त्यांचे सेवाकार्य समाजापुढे आणण्याची संधी मिळाली आहे. त्या प्रमाणेच समाजासाठी अबोलपणे आणि कुठलीही प्रसिद्धी न करता विधायक कार्य करणाऱ्या सेवामहर्षींची गॅलरी देखील हेल्प-फेअर मध्ये बनविण्यात येते. या माध्यमातून पडद्यामागील या खऱ्या हिरोंना समाजापुढे आणण्याचे कार्य हेल्प-फेअरच्या माध्यमातून करण्यात येते. जेणेकरून  गरजूना  मदत करणाऱ्या कार्यसंथांचे कार्यक्षेत्र विस्तारून, व्यापक होऊन त्यांच्या कार्यास चालना, गती व उभारी मिळते.    

मदत घेणारे आणि मदत देणारे असे हजारो हात मदतीचे येथे पहावयास व अनुभवण्यास मिळणार आहे. ज्यांना मदत घ्यायची आहे त्या व्यक्ती संबंधित संस्थांना आणि व्यक्तींना येथे प्रत्यक्ष भेटू शकतील. तसेच ज्या दात्यांना संस्थांना किंवा सेवामहर्षींना मदत करायची आहे असे दाते देखील येथे संस्थांना आणि व्यक्तींना भेटून त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतील

सदर प्रदर्शनीत सहभागी होणाऱ्या संस्थांची निवड प्रक्रिया सुरु झालेली असून तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्तींपर्यंत आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी असून त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त सेवाभावी संस्था, एनजीओज व सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन हेल्प-फेअर टीमकडून करण्यात येत आहे. नाव नोंदणी वा अधिक माहितीसाठी ९९६०८ ९३९१६ आणि ८४४६१ ०१७५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुलांच्या संस्कारात आईनंतर शाळेची महत्वाची भूमिका -संपदा पाटील

Next Post

अभाविप आयोजित मिशन साहसी अभियानास जळगाव येथे येणार–राष्ट्रीय खेळाडू बबिता फोगाट

Next Post
अभाविप आयोजित मिशन साहसी अभियानास जळगाव येथे येणार–राष्ट्रीय खेळाडू बबिता फोगाट

अभाविप आयोजित मिशन साहसी अभियानास जळगाव येथे येणार–राष्ट्रीय खेळाडू बबिता फोगाट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo