Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

२०० नागरिकांनी करुन घेतली हाडांच्या ठिसुळपणा तपासणी अस्थिरोग तज्ञांद्वारे औषधोपचार तर फिजीओथेरपीद्वारे व्यायामाचा सल्‍ला

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
२०० नागरिकांनी करुन घेतली हाडांच्या ठिसुळपणा तपासणी अस्थिरोग तज्ञांद्वारे औषधोपचार तर  फिजीओथेरपीद्वारे व्यायामाचा सल्‍ला

जळगाव(प्रतिनिधी)- वाढत्या वयोमानानुसार शरिरातील हाडांची झीज होत असते. परिणामी हाडांमध्ये वेदना होणे, हि समस्या निर्माण होते. यासाठी २१ ऑक्टोबर या जागतिक अस्थिसुषिरता अर्थातच ऑस्टिपोरोसिस दिनानिमित्त आज २० ऑक्टोबर रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिराचा २०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.

हाडांचा ठिसुळपणा आढळलेल्या रुग्णांना अस्थिरोग तज्ञांसह फिजीओथेरपीस्ट तज्ञांनी देखील मार्गदर्शन केले.गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे रूग्णालयात हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, डॉ.निखील पाटील, डॉ.भवानी राणा, डॉ.कल्पना बाचेवार, डॉ.श्रृती चौधरी, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.सुवर्णा सपकाळे, डॉ.साकीब सैय्यद, डॉ. अनुराग मेहता, डॉ.परिक्षीत, डॉ.मुकेश शिंदे आदि उपस्थीत होते.

याप्रसंगी बोन मिनरल डेन्सीटी टेस्ट या मशिनद्वारे टेक्निशियन सुभाष बांद्रे यांनी रुग्णांची तपासणी केली. सर्वप्रथम ऑस्टिपोरोसिस म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा, त्यावरील उपचार पद्धतीची माहिती दिली. यावेळी २०० हून अधिक रुग्णांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल, डॉ.परिक्षीत, डॉ.सुनित, डॉ.राहूल यांनी रुग्णांना रिपोर्ट आल्यानंतर ज्यांच्यामध्ये समस्या आढळल्या त्यांना उपचाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच हाडांमधील खनिज वाढविण्यासाठी काही औषधी देखील लिहून देण्यात आल्यात. याशिवाय फिजीओथेरपी ओपीडीतून रुग्णांच्या प्रकृती आणि समस्येनुसार व्यायाम करवून घेण्यात आले आणि ते नियमित करण्याचा सल्‍लाही देण्यात आला. तसेच अस्थिसुषिरता ही अशी समस्या आहे, जिचे एकदाच निवारण होत नाही. त्यामुळे वयाच्या ३५ नंतर वर्षभरातून एकदा तज्ञांकडून ही तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo