Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिमंडळ १ मध्ये केली पाहणी;प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्रांमधील सुविधांचा घेतला आढावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिमंडळ १ मध्ये केली पाहणी;प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्रांमधील सुविधांचा घेतला आढावा

मुंबई -प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन करित असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्र, अन्न वितरण केंद्र आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिमंडळ १ मध्ये या अंतर्गत पुरविण्यात येत असलेल्या सेवा-सुविधांची प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांनी विविध ठिकाणी भेट दिली.

प्रारंभी, उपआयुक्त (परिमंडळ १) श्री. हर्षद काळे यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त श्री. जयस्वाल यांनी ई विभाग कार्यालयामध्ये सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतर भायखळा परिसरात ताडवाडी प्रतिबंधित क्षेत्र, रिचर्डसन क्रूडास येथील कोरोना काळजी केंद्र (सीसीसी २) तसेच कम्युनिटी किचन, बी विभाग हद्दीतील हॉटेल बिस्मिल्ला तसेच नजम बाग येथील कोरोना काळजी केंद्र (सीसीसी १) या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ग्रँट वैद्यकीय जिमखाना व चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदीक रुग्णालयामध्येही सीसीसी २ व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी श्री. जयस्वाल यांनी भेट दिली. डी विभागाच्या हद्दीतील एमपी मिल कम्पाऊंड येथे एसआरए इमारतीतील सीसीसी २ सुविधा, आदर्श पॅलेस हॉटेलमधील सीसीसी १ व्यवस्था, ए विभागातील सुंदर नगर आणि सुखदवाला येथे सीसीसी २ सेवेसह ए विभागामध्ये अन्न वितरणासाठी सुरु असलेल्या फूड किचनची व्यवस्था श्री. जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहिली.

या क्षेत्रीय भेटीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा योग्यरित्या होतो आहे किंवा कसे याबाबत विचारपूस केली. कोरोना केंद्रांमध्ये राहत असलेल्या व्यक्तिंच्या भेटी घेऊन त्यांना कोणकोणत्या बाबींमध्ये आणखी सुधारणा अपेक्षित आहेत, सध्या देण्यात असलेल्या सुविधांमध्ये समाधान वाटते किंवा कसे, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. कम्युनिटी किचनमध्ये कार्यरत कर्मचाऱयांना येणाऱया अडचणी, किचनमधून पुरवले जाणारे अन्नाचा दर्जा यांचेही श्री. जयस्वाल यांनी निरीक्षण करुन आवश्यक तेथे सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले.

यावेळी सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव, नितीन आर्ते, चक्रपाणी अल्ले, प्रशांत गायकवाड, मकरंद दगडखैरे हे आपापल्या विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाहणीप्रसंगी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

मुलुंडचे शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार यांच्यातर्फे गोरगरिबांना विभागात अन्नदान

Next Post

मुलुंडचे शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार यांच्यातर्फे गोरगरिबांना विभागात अन्नदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d