Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत प्राप्त -मंत्री छगन भुजबळ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
संभाव्य तिसरी लाट व गणेशोत्सव काळात मोहीम स्तरावर लसीकरण करावे -पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक(जिमाका वृत्त)- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तालुकास्तरावर मदत प्राप्त झाली असून त्यात येवला तालुक्यासाठी ४१.४३ लक्ष मदत मिळाली आहे.सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ते आज येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, अदरसुल उपबाजार येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, प्रांताधिकारी सोपान कासार, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, बाजार समितीचे प्रशासकीय सभापती वसंत पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, अरुण थोरात अंदरसुल बाजार समितीचे मकरंद सोनवणे, संचालक किसनराव धनगे, किसनराव धनगे, प्रमोद पाटील, साहेबराव आहेर, मधुकर साळवे, समीर देशमुख, ज्ञानेश्वर दराडे, शरद शिंदे, प्रेमलता अट्टल, सुवर्णा सोनवणे, राजेंद्र शेलार, बाळासाहेब आवारे, जयाजी शिंदे, गणपत भवर, चंद्रकांत शिंदे, वाल्मिक गोरे, भानुदास जाधव, ज्ञानेश्वर शेवाळे, रतन बोरणारे, सचिन कळमकर, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, दीपक लोणारी, सहायक निबंधक पाटील पाडवी, गट विकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे गेले दोन वर्षे कामांना अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्यापासून कामांना पुन्हा एकदा गतीने सुरुवात झाली आहे. परंतु कोरोना अद्याप संपलेला नाही त्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत.नागरिकांनीही योग्य खबरदारी घेवून सहकार्य करावे. कोरोनाच्या काळात अन्न, धान्याची कमतरता आपण पडू दिली नाही यासाठी माथाडी कामगारांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, बाजार समितीत जमा होणारा महसूल हा विकासासाठी व शेतकरी हितासाठी खर्च करण्यात यावा. उत्तम पद्धतीने महसूल गोळा करावा आणि उदार मनाने शेतकऱ्यांसाठी खर्च करावा. सर्वांना अतिशय जागरूक राहून काम करण्याची आवश्यकता आहे. जीएसटीची मोठी रक्कम केंद्र सरकारकडे प्रलंबित असून राज्याच्या हिश्श्याची येणे असलेली रक्कम राज्य शासनास केंद्र सरकारकडून मिळेल तेव्हा मिळेल परंतु त्यातूनही मार्ग काढत विकास कामे केली जात आहेत, व भविष्यातही शासन विकासाची कामे करत राहील असे सांगून शेतकरी कष्टकरी व नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धरणगाव तालुक्यातील 54 लाभार्थ्यांना 12 लाख 80 हजारांच्या मदतीचे वाटप

Next Post

कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म -रवींद्र चौधरी

Next Post
कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म -रवींद्र चौधरी

कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म -रवींद्र चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d