Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

मुंबई(प्रतिनिधी)- अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत परंतु त्यांनी नोंदणी केलेली आहे अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरित परवाना घ्यावा. बृहन्मुंबई विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अन्न व्यावसायिकांकडील परवाना, नोंदणी तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेत सर्व अन्न व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई विभाग यांनी केले आहे.अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की, अन्न व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमाअंतर्गत परवाना/नोंदणी करुनच अन्न व्यवसाय करावा. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक असून ज्यांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना/नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असून, त्यामध्ये पाच लाखापर्यंत द्रव्य दंडाची व सहा महिने कारावासाची तरतूद करण्यात आलेली आहे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने दिल्या आहेत.

परवाना / नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाईन परवाना किंवा नोंदणीकरीता अर्ज करण्यासाठी https://foscos.fssai.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध असून त्याठिकाणी लागणारी कागदपत्रे व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जेणेकरून कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करता येईल. अर्ज करताना अडचणी आल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुस्लिम सेवा संघाच्या महिला संघटक फिरोजा शेख यांचा मौलीक अधिकार मंचाच्या धरणे आंदोलनास पाठिंबा

Next Post

गिरणाई पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Next Post
गिरणाई पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

गिरणाई पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d