Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ‘जंकफूड’ बाबत जनजागृती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  ‘जंकफूड’ बाबत जनजागृती

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे जंकफूड टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयात जंकफूडची विक्री होणार नाही याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मुलांची प्रत्यक्ष भेट घेवून भविष्यात जंकफूडचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली, अशी माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.श्री. पाटील यांनी म्हटले आहे, की मुले ही भावी नागरिक बनणार आहेत. देशाचे भवितव्य त्यांच्या हाती असणार आहे.

या मुलांचे आरोग्य हे लहानपणापासूनच उत्तम असणे गरजेचे आहे. याविषयी सर्वेक्षण करुन एक निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यात मुले जंकफूडच्या आहारी गेलेली आहेत. मुलांना घरचा पोळी- भाजीचा डबा त्यातून आवश्यक पोषण तत्वे मिळतात. मात्र, शाळा, कॉलेज, कँटीन येथे जंकफुड सहज उपलब्ध होते. मुले ते खातात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे चार- पाच वर्षांच्या मुलांना चष्मे लागतात. त्यांना मधुमेह होतो. त्यांच्यात लठठपणा येतो. त्यामुळे ते सुस्तावतात. खेळत नाहीत, परिणामी त्यांची शारीरिक वाढ खुंटते. मुले निरोगी असतील, तरच त्यांचे अभ्यासात लक्ष लागते. आकलनशक्ती वाढून अभ्यासात प्रगती होते. नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढते. तब्येतीच्या कुरबुरी चालू असतील, तर साहजिकच एकूण शारीरिक व मानसिक वाढीवर लगाम लागतो.

जंकफुड म्हणजेच शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषणतत्त्वांचा अभाव व भरपूर मीठ, साखर व फॅटसचा अंतर्भाव असलेला आहार होय. उदा. केक, बिस्किटस, चॉकलेट, चीप्स्, सॉफ्ट ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा इ. परंतु, या जंकफूडचे आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतात. विशेषत: लहान मुले जंकफूडचे सेवन जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो. मुलांचा स्वभाव हा लहरी बनतो. त्यांना थकवा येवून सुस्ती येते. मुलांमध्ये कमी एकाग्रता, कमी आकलनशक्ती असे परिणाम दिसून येतात. त्याचप्रमाणे, शारीरिक विकासातदेखील अडथळे येतात. मुलांमध्ये लठ्ठपणा, मेदवृद्धी तसेच टाइप-2 मधूमेह, मूत्रपिंड विकार हेदेखील उद्भवण्याचा धोका वाढतो.

मुलांना जंकफूड खाण्यापासून परावृत्त करणेसाठी त्यांना सकाळी व सायंकाळी त्यांच्या भुकेच्या वेळी ताजी फळे, सुकामेवा, बटर मिल्क, नारळ पाणी, लिंबूपाणी इ. असे पदार्थ उपलब्ध करुन द्यावेत. जेणेकरुन भूकही भागेल व शरीराला आवश्यक पोषणतत्वे देखील मिळतील. मुलांच्या आहारात मैदा, मीठ, साखर, तेल यांचे अनावश्यक सेवन होणार नाही, याबाबत कटाक्ष ठेवावा.

अन्न व औषध प्रशासनातर्फे जंकफुड टाळणेविषयी जनजागृती करण्याच्या उददेशाने शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांशी भेटून त्यांच्या शैक्षणिक आवारात जंकफुडची विक्री होणार नाही याविषयी दक्षता घेणेबाबत जागरुकता केली आहे. तसेच, प्रत्यक्षात मुलांच्या भेटी घेवूनभविष्यात जंकफूडचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली व जनजागृती करण्यात आली आहे, असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अटल वयो अभ्युदय योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

शासनाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

शासनाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d