Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आज अनेक पातळ्यांवर देशामध्ये अनास्था आहे. ही अनास्था या अर्थसंकल्पामध्ये दूर होईल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. या अर्थसंकल्पामध्ये आरोग्याच्या तरतुदीसंदर्भात झालेले उल्लेख पाहता आरोग्य हा सरकारच्या प्राधान्यक्रमावरचा मुद्दा आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.

आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आज अनेक पातळ्यांवर देशामध्ये अनास्था आहे. ही अनास्था या अर्थसंकल्पामध्ये दूर होईल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. या अर्थसंकल्पामध्ये आरोग्याच्या तरतुदीसंदर्भात झालेले उल्लेख पाहता आरोग्य हा सरकारच्या प्राधान्यक्रमावरचा मुद्दा आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. यूजी आणि पीजीच्या जागा वैद्यकीय शिक्षणामध्ये वाढवताना जर जिल्हा रुग्णालयावरील खर्चात कपात करण्यात येणार असेल तर उत्तम वैद्यकीय व्यवस्थेची सांगड कशा प्रकार े घालणार, हा प्रश्न उतरतोच. देशामध्ये डॉक्टरांना सुरक्षित वातावरण नाही, त्यासाठी सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांची सुरक्षा बळकट करण्यासाठी काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. यावेळी देशातील वातावरण पाहता ही अर्थसंकल्पीय तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात मात्र ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्याच्या पातळीवर सपशेल अपेक्षाभंग करणारा असाच हा अर्थसंकल्प आहे, असे म्हणायला खचितच वाईट वाटते. 

औषधे तसेच वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये जितक्या वेगाने प्रगती होत आहे तितकेच वैद्यकीय सेवांचे दरही वाढत आहेत. यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा विश्वास सरकारने द्यायला हवा होता. गेल्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये आरोग्याच्या काही मुद्द्यांवर किमान प्रकर्षाने भर देण्यात आला होता, यंदा मात्र तो दिलासाही राहिला नाही. 

उत्पादनक्षमता आरोग्यावर अवलंबून
देशातील जीडीपीमधील आरोग्यावर केला जाणारा खर्च किती आहे, यावर त्या देशातील सर्वसामान्यांच्या आरोग्याचा स्तर निश्चित होत असतो. त्यातून सर्वसामान्यांच्या उत्पादनक्षमतेबद्दलचेही निकष ठरत असतात. सर्वसामान्यांचे आरोग्य चांगले नसेल तर उत्पादनक्षमताही चांगली राहत नाही. अर्थसंकल्पात याचा अजिबात विचारच झालेला नाही.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

Next Post

विमानतळाची धावपट्टी ८८ तासांनंतर सुरू

Next Post
विमानतळाची धावपट्टी ८८ तासांनंतर सुरू

विमानतळाची धावपट्टी ८८ तासांनंतर सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d