Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ च्या धर्तीवर महाराष्ट्रातही योजना विचाराधीन – मंत्री रवींद्र चव्हाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

मुंबई, दि. 21 : गोवा सरकारतर्फे राबविण्यात येणारी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही अतिशय अभिनव व प्रेरणादायी स्वरुपाची योजना आहे. या योजनेसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ योजनेची अभिनव कल्पना भविष्यात महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज गोवा येथे केले.

            गोवा सरकारच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ योजनेचा अभ्यास करण्यासाठी गोवा येथे गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्राच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण उपस्थित होते. गोवा सरकारच्या नियोजन महासंचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमाअंतर्गत मंत्री श्री. चव्हाण यांनी विशेष परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडली.

            मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना संपूर्ण देशासाठी आदर्शवत अशी योजना आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशाच स्वरुपाच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे काम व विविध योजना महाराष्ट्रात राबविण्यात आल्या होत्या. या अभियानाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते.

            राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेली ही स्वयंपूर्ण योजना आहे. अंत्योदय, ग्रामोदय व सर्वोदय या तत्वांवर आधारीत योजनेचे स्वरुप आहे. एका शासकीय अधिकाऱ्यांकडे एका गावाची जबाबदारी सोपविण्यात येते. ही जबाबदारी पार पाडणाऱ्या या अधिकाऱ्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हटले जाते असे सांगताना मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना या योजनेमार्फत वैयक्तिक लाभ मिळवून देण्यात येतो. तसेच गावांच्या विकासासाठी शासकीय योजनेमार्फत किंवा लोकसहभागातून आवश्यक उपक्रम अथवा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्वयंपूर्ण मित्राच्या मार्फत राबविण्यात येत असून सुमारे १८०० हून अधिक प्रकारची कामे या योजनेखाली राबविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिकरित्या या योजनेकडे लक्ष असून या योजनेचा सातत्याने आढावाही वेळोवेळी घेण्यात येतो असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची आय एम आर कॉलेज कमेटी नियुक्त

Next Post

केसीई चे आयएमआर मध्ये 37 व्या एमबीए बॅचचा इंडक्शन प्रोग्राम

Next Post

केसीई चे आयएमआर मध्ये 37 व्या एमबीए बॅचचा इंडक्शन प्रोग्राम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d