Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श गाव योजनेत समाविष्ट गावामध्ये कृषी विभागाच्या योजना राबवा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आदर्श गाव योजनेत समाविष्ट गावामध्ये कृषी विभागाच्या योजना राबवा

मुंबई- आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कृषि योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशासनाला दिली.आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते.

आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरजकुमार, सहसचिव (जलसंधारण) सुभाष गावडे, संचालक (जलसंधारण) श्री. शिसोदे, अवर सचिव (मृद व जलसंधारण) शुभांगी पोटे, आदर्श गाव समितीचे कृषि उपसंचालक सुरेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, लोकसहभागातून ग्रामविकास ही आदर्श गाव निर्मितीची संकल्पना आहे. हिवरे बाजार सारख्या गावाने त्या माध्यमातून विकास साधला आहे.

या योजनेत सहभागी इतर गावांमध्ये कृषि विषयक योजनांची सांगड घातली तर ग्रामविकासाला अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.यावेळी श्री.पोपटराव पवार यांनी आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी ही नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, श्रमदान या पंचसूत्रीनुसार करण्यात येत होती. त्यामध्ये आता लोटाबंदी (हागणदारीमुक्त गाव) आणि बोअरवेल बंदी यांचा समावेश करुन या सप्तसूत्रीनुसार निकष ठरवण्यात आल्याचे सांगितले.

या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, गाव विकास (बिगर गाभा कामे), कृषि विकास कामे, पर्यावरण संवर्धन, मत्ता नसलेल्यांसाठी उपजीविका उपक्रम, उत्पादनाची व स्वयंरोजगाराची साधने यांची निर्मिती, समूह संगठन, गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध क्षेत्रातील क्षमता विकास यामध्ये समन्वय आदी कामे करण्यात येत असल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

Next Post

पत्रकार दिनानिमीत्त मुक्ताईनगर शहरात लसीकरण शिबिर संपन्न

Next Post
पत्रकार दिनानिमीत्त मुक्ताईनगर शहरात लसीकरण शिबिर संपन्न

पत्रकार दिनानिमीत्त मुक्ताईनगर शहरात लसीकरण शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d