Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान व योगेंद्र वानखेडे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/01/2025
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
आबासाहेब  भीमराव शामराव  शेळके यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान व योगेंद्र वानखेडे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव -(रिपोर्टर ईश्वर खरे) -धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी कैलासवासी द्रुपदाबाई यादव सरोदे यांच्या सातवे पुण्यस्मरणार्थ कृतज्ञता दिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना अपेक्षित संच वाटप व पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव यु यु पाटील सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्वासराव आनंदराव पाटील तर विशेष अतिथी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष अ अ पटेल सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ यु डी शेळके मॅडम व सेवानिवृत्त प्राचार्य एन एम भामरे लोहारा येथील माजी उपसरपंच कैलास चौधरी स्थानिक सल्लागार समिती सदस्य दत्तू भिका माळी शिवराम भडके साहेब माजी मुख्याध्यापक आर एस चौधरी सर शैलेंद्र शेळके महेंद्र आप्पा शेळके गावातील पत्रकार बंधू विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे सर पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर तसेच पंचक्रोशीतील नागरिक व भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर गावकरी मंडळी यांच्या हस्ते सरस्वती माता व कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड कैलासवासी द्रुपदाबाई यादव सरोदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सरोदे परिवाराकडून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास सरोदे यांनी केले पुण्यस्मरण कृतज्ञता दिनानिमित्त चे महत्त्व त्यांनी सांगितले सरोदे परिवारातर्फे लोहारा विद्यालयातील इयत्ता दहावीतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी 13 अपेक्षित संचांचे वाटप करण्यात आले तसेच शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार सरोदे परिवारातर्फे देण्यात आला हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष यु यु पाटील सर प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयातील विचारवंत उपशिक्षक वाय पी वानखेडे सर यांना शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले हा पुरस्कार शेंदुर्णी संस्थेचे सहसचिव यु.यु पाटील सर व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

सन्मानपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ व शाल अशा स्वरूपात पुरस्कार वितरित करण्यात आला सन्मानपत्राचे वाचन विद्यालयातील मुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम व सुभाष सरोदे यांनी केले तसेच जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक अंकुश भुत्ते यांचा सुध्दाआदर्श शिक्षकाच्या स्वरूपात ट्रॉफी सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थी ललित ज्ञानेश्वर चौधरी विद्यार्थिनी अनुजा योगेश पाटील यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थीनी सरोदे परिवाराचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले विशेष अतिथी येणे भामरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयातील उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख अतिथी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्वासराव आनंदराव पाटील यांनी आपल्या मनोगत पर भाषणातून सत्कार अर्थी चे कौतुक करून विविध शैक्षणिक कार्याविषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना जाणता राजा या पुस्तकांचे वाटप करण्यात आले संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांनी आपल्या मनोगत पर भाषणातून लोहारा विद्यालयाची स्थापना कशाप्रकारे झाली होती वाढीसाठी कसे प्रयत्न केले याविषयी थोडक्यात माहिती दिली व पुरस्कार दिल्याबद्दल सरोदे परिवाराचे आभार मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव यु यु पाटील सर यांनी आपल्या भाषणातून सरोदे परिवाराने राबवलेल्या विशेष उपक्रमाचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सरोदे यांनी केले व आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

Next Post

प्रा. वंदना महाजन यांना क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे डॉक्टरेट

Next Post
प्रा. वंदना महाजन यांना  क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे डॉक्टरेट

प्रा. वंदना महाजन यांना क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे डॉक्टरेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d