Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्यासह बहुपर्यटन हबकडे नाशिकची वाटचाल -पालकमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
मंत्री छगन भुजबळ यांचा शुक्रवार जिल्हा दौरा

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- कोरोनासह भविष्यातील इतर सर्व आजांरावर उपचार होण्यासाठी नाशिक शहरात वैद्यकीय पर्यटनाचे हब तयार करण्याचा मानस आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला पर्यटनाकरिता पर्याय उलपब्ध व्हावे यासाठी नाशिक शहराची आरोग्यासह बहुपर्यटन हबकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

शालीमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील नवीन इमारतीचा बांधकाम भूमीपूजन सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल,आमदार देवयानी फरांदे,महापौर सतिष कुलकर्णी ,उपमहापौर भिकुबाई बागुल, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की , उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालये नाशिक शहरात उभे राहत आहेत. तसेच आज विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पेडीयाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टीक सर्जरी , अर्भक अति दक्षता विभाग असे 105 खाटांचे नवीन इमारतचे भूमिपूजन पार पडले असून लवकरच हे रुग्णालय नागरिकांचे सेवेसाठी सुसज्ज होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्राची प्रमुख राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक शहराचा विकास आरोग्य, पर्यटन आणि शैक्षणिक या तिन्ही घटकांवर करण्यात येणार आहे. जेणेकरुन उत्तरमहाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता येईल. तसेच कारोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावरुन करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळतांना दिसतआहे. त्यामुळे यंदा दिवाळी आनंदात साजरी करत करतांना अर्थ,आरोग्य व सामाजिक चक्र सुरळीत चालु राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील नवीन इमारतीसाठी एकूण 20 कोटी 49 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन इमारतीमध्ये 30 खाटांचे पेडीयाट्रिक, 30 खाटांचे न्युरोसर्जरी, 30 खाटांचे प्लास्टीक सर्जरी विभागासाठी , 15 अर्भक अति दक्षता विभागासाठी असे एकूण 105 खाटांचे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी आल्या प्रास्ताविकात दिली आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या हस्ते वर्ष २०२० चे राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार प्रत्यक्षपणे प्रदान

Next Post
केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या हस्ते वर्ष २०२० चे राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार प्रत्यक्षपणे प्रदान

केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या हस्ते वर्ष २०२० चे राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार प्रत्यक्षपणे प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d