Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’-‘Mission Twentieth’ in Melghat through Asha Sevika and Anganwadi Sevika

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’-‘Mission Twentieth’ in Melghat through Asha Sevika and Anganwadi Sevika

मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहीम

अमरावती, दि. 19 : मेळघाटात मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व व नंतर असे एकूण 28 दिवस मार्गदर्शन व आवश्यक उपचार मिळवून देणारी मोहीम जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आशासेविका व अंगणवाडीसेविकांच्या संयुक्त पथकाकडून गरोदर मातांशी संपर्क साधून प्रकृतीची माहिती मिळवून उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.  ‘मेळघाट मिशन 28’ अंतर्गत आशासेविका  व अंगणवाडी सेविका माता व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, प्रसूती सुरक्षित व्हावी आदींसाठी आवश्यक माहिती संकलन, उपचारासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्य सेविका,आशा सेविका व अंगणवाडी सेविका असे ‘ट्रिपल ए’ मनुष्यबळ आरोग्य सेवेचा पाया मानला जातो. ‍या महिला कर्मचारी मेळघाटात घरोघर जाऊन मातेस प्रसुतीअगोदर व नंतर एकूण 28 दिवस आधी ट्रॅकिंग करणार आहेत. त्यात आरोग्याबाबत विविध प्रपत्रे भरून घेण्यात येणार आहेत.

धारणी व चिखलदरा तालुका मिळून सुमारे सव्वातीन लाख लोकसंख्या असलेल्या मेळघाटात माता नोंदणीची आकडेवारी साधारणत: साडेसहा हजार आहे. गरोदर माता, स्तनदा माता व नवजात बालकांना भेटून आवश्यक माहिती संकलन आशा व अंगणवाडी सेविका करणार आहेत.

आरोग्य उपचाराच्या दृष्टीने प्रसुतीची अपेक्षित तारीख, खेप, हिमोग्लोबिनची मात्रा, इतर लक्षणे, आजार, काही धोक्याची लक्षणे आहेत किंवा कसे, आदी बाबींची तपासणी व विचारणा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, बालकाची तपासणीही करून माहिती संकलन करण्यात येणार आहे. या तपासणीमुळे माता व बालकांतील धोका व जोखीम ओळखण्यास मदत होऊन गतीने उपचार मिळवून देणे शक्य होईल.  मेळघाटात दोन्ही तालुक्यांत ४७८ अंगणवाडी सेविका व ३९७ आशासेविका कार्यरत आहेत, असे श्री. डॉ. रणमले यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सधन कुक्कुट विकास गटासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन-Appeal to submit proposal for Intensive Poultry Development Group

Next Post

शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे-Establishment of Shakti Law Awareness Committee – Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe

Next Post
शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे-Establishment of Shakti Law Awareness Committee – Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe

शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे-Establishment of Shakti Law Awareness Committee - Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d