
आज दि.13 मार्च 2022 रोजी, इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल येथे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेचे चेअरमन श्री. नरेश चौधरी , शाळेच्या प्राचार्य परवीन मॅडम, समन्वयक श्री. जी. डी. पाटील शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी डाँ.आंबेडकरांचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले.त्याच बरोबर शाळेतील क्रिडा शिक्षक पवार सर आणि विद्यार्थीनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, बाबासाहेब व शाहू महाराज यांची भेट, तसेच महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हे नाट्य स्वरूपात सादर करून महामानवास विनम्र अभिवादन केले.











