अमळनेर – (प्रतिनिधी) – उच्च व तंत्र शिक्षण सह संचालक कार्यालयात कार्यरत कर्मचारी अजय शिवरामे यांना त्यांच्या उत्कृष्ट, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा अमळनेर तसेच अमळनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार व पोलीस दिन महोत्सव अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या महोत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अजय शिवरामे यांनी कार्यालयीन कामकाजात दाखवलेली कार्यक्षमता, शिस्तप्रियता, नागरिकांप्रती असलेली सकारात्मक भूमिका तसेच वरिष्ठ व सहकाऱ्यांशी असलेले सहकार्यपूर्ण संबंध याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या सन्मानामुळे कार्यालयातील सहकारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.










