Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्या पाचोरा-भडगाव तालुक्यातील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार-अमोल शिंदे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
31/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
उद्या पाचोरा-भडगाव तालुक्यातील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार-अमोल शिंदे

पाचोरा(प्रतिनिधी)- दिनांक १ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधव उद्या दिनांक १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चातून आपल्या समस्या मांडणार आहेत.

सदर मोर्चात या प्रमुख मागण्या असतील. १)ऐन खरीप हंगामाच्या शेवटी रब्बीच्या सुरुवाती साठी पाण्याची गरज असतांना ट्रान्सफार्मर वीज पुरवठा खंडित करून पुन्हा जोडणी करीता सक्तीची वीज वसुली थांबवावी.२)शेतीला वीज पुरवठा करणारे ट्रांन्सफार्मर नादुरुस्त झाल्यावर त्वरित बदलून मिळावे व त्यासाठी सक्तीचे वीज बिल वसुली करु नये.३)रात्री अपरात्री होणाऱ्या शेती वीजपुरवठा धोरणात तात्काळ बदल करून रात्री ऐवजी दिवसा शेतीला नियमित वीज पुरवठा करण्यात यावा.४)अतिपावसामुळे जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदत ऐवजी त्यात वाढ करून दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करावी.५)पिक विमा योजना सन २०२०- २०२१ अंतर्गत कापूस, उडीद, मुंग, सोयाबीन, इ. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी.६)सन २०१८ व सन २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी७)भडगाव तालुक्यात जून २०१९ मध्ये झालेल्या वादळी वारा व गारपिटीची तसेच मार्च २०२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी८)पाचोरा व भडगाव तालुक्यात जनावरांवरिल लम्पी या आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येक गाव पातळीवर जाऊन गुरांचे लसीकरण करण्यात यावी.

वरील मागण्या मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले तसेच या ठाकरे सरकार च्या सुलतानी निर्णयाने शेतकरी बांधव पूर्णपणे अडचणीत सापडले असून, शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी असेल सक्तीची वीजबिल वसुली,सतत ट्रांसफार्मर बंद पडल्यावर होणारे हाल,मागील काळातील प्रलंबित नुकसान भरपाई,रात्री-अपरात्री अनियमित पद्धतीने होणारा शेतीला वीज पुरवठा,अतिवृष्टी काळात जाहीर केलेली तोडक्या मदती ऐवजी वाढीव मदत,तसेच जनावरांवरील लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव या सर्व बाबतीत या तालिबानी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात सुलतानी निर्णय घेतल्याने यंदाची दिवाळीही शेतकरी बांधवांच्या आयुष्यातील अंधारमय अशी काळी दिवाळी ठरेल.

असे सांगत अमोल शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य मधुकर काटे, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,शहराध्यक्ष रमेश वाणी, किसान मोर्चा पाचोरा तालुकाध्यक्ष विश्वास पाटील,भडगाव तालुकाध्यक्ष यशवंत पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील, दीपक माने,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे,सुनील पाटील,भैया ठाकूरआदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इंधन दरवाढ, हेच का अच्छे दिन? -राज्यव्यापी सायकल रॅलीत युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल

Next Post

दिवाळी उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सुचना

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

दिवाळी उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सुचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d