Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी

पत्रकारासह आठ संशयितांना अटक ;तीन महिलांचा समावेश

एरंडोल-(प्रतिनिधी) – येथील प्रसिद्ध उद्योजक तथा बालाजी ग्रुपचे संचालक अनिल गणपती काबरे यांना वारंवार धमक्या देवून आठ लाखांची खंडणीची मागणी करणा-या न्यूज २४ महाराष्ट्रच्या पत्रकारासह आठ संशयिताना पोलिसांनी सापळा रचून खंडणी स्विकारताना अटक केली.संशयितांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.यामधील एक महिला तीन पुरुष यांना पोलिसांनी आपल्या सहका-यांना पकडल्याची चाहूल लागताच चारही जणांनी मोटार सायकलवरून पळ काढला मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, हवालदार जुबेर खाटिक,महिला पोलीस ममता तडवी,होमगार्ड दिनेश पाटील यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पाळधी पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले.

याबाबत माहिती अशी कि, येथील प्रसिद्ध उद्योजक अनिल गणपती काबरे व त्यांच्या परिवारातील सदस्यांची म्हसावद रस्त्यावर बालाजी ऑईल मिल नावाची तेलाची कंपनी आहे. श्री.अनिल काबरे यांना एक महिला व एका पुरुषाने तुमच्या ऑईल मिल बाबत सरकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात येईल अशी धमकी देवून सात ते आठ लाखांची खंडणी मागितली. उद्योजक अनिल काबरे यांनी खंडणीची धमकी आल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दिली.

खंडणी मागणी करणारे खंडणीखोर खंडणीची रक्कम घेण्यासाठी आज येणार असल्याची माहिती अनिल काबरे यांनी पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल हवालदार अनिल पाटील,मिलिंद कुमावत,संदीप पाटील,जुबेर खाटिक महिला पोलीस ममता तडवी,होमगार्ड दिनेश पाटील यांनी पंचांसह बालाजी ऑईल मिल येथे सापळा रचला. त्यावेळी दोन महिला व दोन पुरुष हे खंडणी मागण्यासाठी ऑईल मिलमध्ये आले.तर एक महिला व तीन पुरुष मिलच्या बाहेर उभे राहिले होते.मिलमध्ये आलेल्या आलेल्या खंडणीखोरांपैकी एका महिलेने उद्योजक अनिल काबरे यांचेकडून एक लाख रुपयांची खंडणी स्विकारताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने महिलेसह तिच्या साथीदारांना पकडले.पोलिसांनी सहका-यांना पकडल्याची चौल लागताच मिलच्या बाहेर थांबलेल्या एक महिला व तीन पुरुष यांनी मोटारसायकलवरून म्हसावद नाकामार्गे जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांच्या सहका-यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पाळधी पोलिसांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेतले.सर्व खंडणीखोरांना ताब्यात घेवून पोलीस स्थानकात आणले.पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे साक्षी राजू तायडे,रा.कुलकर्णी प्लॉट,धम्मनगर,भुसावळ,मोहिनी विनोद लोखंडे, रा.पिंपरी,पुणे ह.मुक्काम कुलकर्णी प्लॉट, धम्मनगर भुसावळ, शशिकांत कैलास सोनवणे, रा.द्वारकानगर, भुसावळ, सिद्धार्थ सुनील सोनवणे,रा.ताप्ती क्लब भुसावळ,रुपाली राजू तायडे,रा.धम्मनगर भुसावळ,आकाश सुरेश बोदडे रा.तळणी,ता.मोताळा,मिलिंद प्रकाश बोदडे (पत्रकार न्युज २४ महाराष्ट्र), रा.तळणी, ता.मोताळा, जि.बुलढाणा, गजानन आनंदा बोदडे रा.धम्मनगर भुसावळ असल्याचे सांगितले.सर्व सातही खंडणीखोराना पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान पत्रकार मिलिंद बोदडे यांनी यापूर्वी देखील विविध शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या नावाने बालाजी ऑईल मिल विरोधात तक्रारी करून अनिल काबरे यांचेकडून सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये खंडणी घेतली आहे.सर्व संशयितांनी अनिल काबरे यांना मिलबाबत तक्रारी करण्याची धमकी देवून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

पोलिसांनी त्यांना आज सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले.पोलिसांनी संशयितांकडून एक लाख रुपये रोख,आठ मोबाईल,दोन मोटारसायकल व एक डिझायर कार असा १० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांमध्ये दोन महिला यांचे वयाबाबत साशंकता असल्यामुळे त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव,उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.दरम्यान बालाजी उद्योग समुहाचे काबरे परिवार यांच्याकडे खंडणी मागितल्याची माहिती शहरात समजताच एकाच खळबळ उडाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संक्रातीला प्रातःकालीन स्वरोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

Next Post

ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

Next Post
ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d