Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उप कार्यकारी अभियंत्याला मारहाण ;भांडण सोडविणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाचा धक्काबुक्कीत खाली पडून मुत्यु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
उप कार्यकारी अभियंत्याला मारहाण ;भांडण सोडविणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाचा धक्काबुक्कीत खाली पडून मुत्यु

मारहाणीत वायरमनचा मृत्यू झाल्याने दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

भडगाव – (प्रमोद सोनवणे) – येथील महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण करणार्‍यांना आवरण्यासाठी गेलेल्या वायरमनचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे, या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भडगाव येथे आज शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यांचे कृषीपंप विज तोडणी, कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भडगाव उप विभागातील शहर, ग्रामीण भागातील उपकेंद्राना टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड लगत असलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयात सात अज्ञात ? लोकांनी प्रवेश करत कार्यालयात कार्यरत असलेले उप कार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे (वय ४३) रा. पाचोरा यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने प्रवेश करत जबर मारहाण सुरू केली. यात कंम्प्युटर, युपीएस. तसेच टेबलावरील व कँबिनच्या काचा फोडत अंदाजे ५० ते६० हजार रुपये पर्यन्तच्या शासकीय मालमत्तेचे साहित्य फोडुन नुकसान करुन उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना चापटाबुक्क्यानी मारहाण, शिवीगाळ करत दमदाटी केली, यावेळी घटनास्थळी असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन प्रताप राणे हे भांडण सोडविण्यास गेले असता अज्ञात इसमांनी गजानन राणे यांना देखील धक्काबुक्की केली, यात गजानन राणे खाली पडुन मयत झाले, यामुळे प्रचंड खळबळ उडाली, या घटनेमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

अजय धामोरे यांना मारहाण करण्यास आलेले अज्ञात ७ इसम वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन राणे यांचे मरणास कारणीभुत असुन उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे फीर्यादीत नमुद केले आहे, याबाबत उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांनी पो.स्टेला दिलेल्या फीर्यादीवरुन अज्ञात ७ इसमा विरुध्द गुरन १३३/२०२१ भादवि कलम ३०७, ३०४, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, सह सार्वजनिक मालमत्तेची हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांची भेट

भडगांव महावितरण कंपनीच्या अधिकारी वर हल्ला हल्यात वायरमन मयत या घटनेची माहिती भडगांव शहरासह तालुक्यात वार्‍या सारखी पसरली, महावितरणचे कर्मचारी यांनी कार्यालयाकडे धाव घेत अधिकारी यांना धिर देत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, चाळीसगाव भाग उप विभागिय पोलीस आधिकारी कैलास गावडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट देत तपास बाबत मार्गदर्शन केले याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर हे करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना

Next Post

उडाण फाउंडेशनतर्फे स्तनदा मातांना खजूर वाटप

Next Post
उडाण फाउंडेशनतर्फे स्तनदा मातांना खजूर वाटप

उडाण फाउंडेशनतर्फे स्तनदा मातांना खजूर वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d