Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांना कर्ज उभारणीसाठी शासन हमी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई ९ जून : महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व एम.एस.ई.बी. सूत्रधारी कंपन्याद्धारे निधी उपलब्ध करण्याची गरज असून त्यासाठी एनटीपीसी, पीएफसी किंवा राष्ट्रीयकृत बँका आणि वित्तीय संस्था यांच्याशी करण्यात येणाऱ्या विविध करारास शासन हमी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य शासनातर्फे कमाल 20 हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल.

तसेच या हमीच्या अनुषंगाने आकारण्यात येणारे २% शुल्क माफ करण्याच्या प्रस्तावास देखिल मान्यता देण्यात आली आहे.

हमी शुल्क माफ़ करण्याच्या संबंधाने निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याच्या निर्णयास देखिल मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत. सर्वसामान्य जनता देखील घरी असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांकडून विजेचा जास्त वापर होऊन औद्योगिक ग्राहकांची विजेची मागणी कमी झाली आहे.

महाराष्ट्रातील विजेची सरासरी रोजची मागणी 23 हजार मेगावॅटवरुन 16 हजार मेगावॅट इतकी कमी झाली आहे. सबसीडाईज्ड क्षेत्रातील कृषी व घरगुती ग्राहकांची मागणी वाढली असल्याने महावितरणची तूट वाढली आहे.

कृषी व घरगुती ग्राहकांना सरासरी वीज पुरवठा दरापेक्षा कमी दराने वीज पुरवठा होतो व त्याची भरपाई औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना सरासरी वीज पुरवठा दरापेक्षा जास्त दराने वीज पुरवठा करून करण्यात येत असते. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या मागणीत विलक्षण घट झाल्याने क्रॉस सबसिडीच्या धोरणानुसार सवलतीच्या दरात देण्यात आलेल्या वीजेमुळे मोठी तूट निर्माण झाली आहे. यामुळे महावितरणची जवळपास 7500 कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे.

महावितरणचा सरासरी विजपुरवठ्याचा दर 7 रुपये 24 पैसे प्रती युनिट असून कृषी ग्राहकाला प्रती युनिट 2 रुपये 25 पैसे दराने व 100 युनिटपर्यंत घरगुती ग्राहकाला 3 रुपये 46 पैसे दराने वीज पुरवठा करण्यात येतो. औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांकडून वीज वापर न झाल्याने महावितरणची तूट वाढली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरपंचांचे प्रलंबित मानधन अदा करण्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांच्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही

Next Post

लॉकडाऊन काळात २३,९२५ व्यक्तींना अटक, ६ कोटी ७८ लाखांचा दंड

Next Post
१० लाख ७८ हजार १२१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

लॉकडाऊन काळात २३,९२५ व्यक्तींना अटक, ६ कोटी ७८ लाखांचा दंड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d