Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात 28 मार्चपर्यंत जनता कर्फ्यु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधक उपययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल नगरपरिषद हद्दीत 28 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत जनता कर्फ्यु पालन करण्याचे आवाहन केले असून शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत.

या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. अपवादात्मक परिस्थीतीत रेशन दुकानाबाबत काही वेळ तहसिलदार यांनी ठरवून घ्यावी. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये बंद राहतील. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पुर्व नियोजित परिक्षा असल्यास त्याचे तहसिल कार्यालयाकडून पास घेवून आयोजन करता येईल. सर्व हॉटेल/ रेस्टॉरंट (अत्यावश्यक सेवेसाठी होम डीलाव्हरी/ पार्सल देणारे हॉटेल वगळता ) बंद राहतील.

सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप, दारु दुकाने, फेरीवाले व्यवसाय बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडास्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.

दुधाची दुकाने, मेडीकल दुकाने वृत्तपत्र सेवा, मिडीया सेवा, कुरिअर, पेट्रोलपंप (अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी ) रुग्णाला ने-आण करणारी रिक्षा सेवा सुरू राहील. दुधाची दुकाने सकाळी 6 ते 9 आणि सध्याकाळी 5 ते 7 या वेळेत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज, शासकीय कार्यालये (50 टक्के उपस्थितीत), पूर्वीचे नियोजीत परिक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरु राहतील. आंतरराज्य व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक (जसे एस.टी. महामंडळ, पोस्ट विभागाचे वाहने) सुरु राहतील. रेल्वे, विमान बस सेवा सुरु राहतील.

मेडिकल उपचार करणारे नागरिक / रुग्ण, त्यांची ने आण करणारे रिक्षा, मेडीकल दुकानातून औषधी घेणारे नागरिक, शासकीय कामावर असणारे कर्मचारी, रेशन घेण्यासाठी येणारे नागरिक, अपवादात्मक परिस्थीतीत प्रवास करणारे वाहन यांना पोलीस / न.प. पथकाला ओळखपत्र/ उपचाराचे कागद व इतर कागदपत्रे दाखवावे लागतील. मेडीकल दुकाने, दुधाची दुकाने, रुग्ण वाहिका, रुग्णाला उपचारासाठी नेणारी रिक्षा, शासकीय कर्तव्यावर असणारी वाहने, आपत्ती व्यवस्थापन व तातडीच्या शासकीय सेवेवर असणारे अधिकारी कर्मचारी, शासकीय कामासाठी नेमलेले पथक व त्यांचे मदतनीस यांना या आदेशातून सुट देण्यात येत आहे.

तसेच इतर शासकीय आस्थापनांना (उदा, कृषिविभाग, महावितरण, टेलिफोन) घरपोच सर्वे, सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुनच नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसिल कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहिल.

एरंडोल क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या निर्बधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रीया संहिता,1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची पहुर कोव्हिड संशयित रुग्ण शोध मोहिमेस संयुक्त भेट

Next Post

जळगाव व पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी सुरू राहणार

Next Post

जळगाव व पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी सुरू राहणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d