Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

जळगाव : आपल्या देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे अनेक प्रकार रोज घडत आहेत. त्यांचे शारीरिक, मानसिक शोषनांच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि या सर्वांना कुठेतरी थांबविणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा विदारक परिस्थिती मध्ये युवतींना योग्य दिशा मिळावी, त्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना म्हणजेच एसडी सीड तर्फे “स्मार्ट गर्ल” (युवती सशक्तीकरण) या दोन दिवसीय मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालय जळगाव  येथे नुकतेच करण्यात आले होते.

महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत युवतींसाठी आयोजिलेल्या या शिबिरात तज्ञ मार्गदर्शक श्री रत्नाकर महाजन, हिंगोली यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दोन दिवसीय शिबिराला संस्थेचे अध्यक्ष व एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड सदस्य डॉ. आर.एस. डाकलिया, माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. माया अंबटकर, शिशुविकासच्या सौ. मुक्ता पाटील, एसडी-सीड समन्वयक श्री. प्रवीण सोनवणे हे उपस्थित होते.

सूत्र संचालन श्री. गिरीश जाधव यांनी केले तर आभार सौ. अनिता शिरसाठ यांनी मानले.

या शिबिरात महाजन यांनी दोन पिढ्यांमधील वाढता दुरावा, संवादाचा अभाव, मैत्रीचे चांगले-वाईट परिणाम, मुली-मुलांमधील शैक्षणिक विकासातील तफावत, वैवाहिक जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शनाचा अभाव, आंतरजातीय विवाह, घटस्पोटाची वाढती संख्या, मोबाईल व इंटरनेट चा वाढता प्रभाव आदी विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनी बरोबरच त्यांच्या पालकांशी देखील हितगुज केले.

एसडी-सीड मागील बारा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.

हे शिबीर  यशस्वी होण्याकरिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सूर्यवंशी आणि विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

औदुंबरच्या अध्यक्षपदी अँड. मोहन शुक्ला, सचिवपदी विलास मोरे तर सहसचिवपदी कुंझरकर यांची निवड

Next Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह, व अश्लील पोस्ट व्हायरल केल्याने तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह, व अश्लील पोस्ट व्हायरल केल्याने तरुणावर गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d