Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसडी-सीड शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
एसडी-सीड शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वतःला सक्षम बनवावे या उद्देशाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना जून २००८ मध्ये जाहीर करण्यात आली. त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा एसडी-सीड लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचे नुतनीकरण करण्यात येत आहे. गेल्या चौदा वर्षात जळगाव जिल्ह्यातील सुमारे १४३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे.“गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्ये विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे” हे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून विचार करता शिष्यवृत्तीचे हे कार्य अधिक सुलभ व्हावे व अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून एसडी-सीडच्या www.sdseed.in या वेबसाईटवर शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाईन अर्ज भरून एसडी-सीड कडे पाठविण्याची प्रक्रिया:- एसडी-सिडच्या वेबसाईट वर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज यशस्वीरीत्या भरण्याविषयी सर्व विस्तृत माहिती व मार्गदर्शन तसेच आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर पोच पावतीची प्रिंट घेऊन त्यासोबत आवश्यक व बंधनकारक असणारी सर्व कागदपत्रे जोडून विद्यार्थ्यांनी ते एसडी-सीड कार्यालय ७, शिवाजी नगर जळगाव येथे दिलेल्या मुदतीत पाठवायचा आहे.शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजिण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती योजनेचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख सौ. रत्नाभाभी जैन, कार्यध्यक्षा मीनाक्षी जैन आणि निवड समिती प्रमुख डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

देशातील पहिले आधार गांव म्हणून “या” गावाची ओळख; आधार कार्डाचा अकरावा वर्धापन दिन

Next Post

१९ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या अस्थीरोग तज्ञांद्वारे यशस्वी उपचार

Next Post
१९ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या अस्थीरोग तज्ञांद्वारे यशस्वी उपचार

१९ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या अस्थीरोग तज्ञांद्वारे यशस्वी उपचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d