Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राज्य, विशेष, सामाजिक
Reading Time: 1 min read

आचार्य अत्रे सार्वभौम व्यक्तिमत्व- कविवर्य महानोर

जळगाव, दि. 13 (विशेष प्रतिनिधी) : – आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य, चित्रपट, उद्योग, वक्तृत्व असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे प्रतिपादन कविवर्य ना. धों. महानोर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.


संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर यांना प्रदान केला. ‘आत्रेय’ तर्फे हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम मुंबई शिवाय खानदेशात जैन हिल्सला झाला. व्यासपीठावर कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. शिरीष चौधरी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते.
आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘आत्रेय’ संस्था तर्फे राजेंद्र पै यांनी मान्यवरांचे स्वागत केले. परिवर्तन संस्थेचे कलाकार वैशाली शिरसाळे, अक्षय गजभिये, सुदीप्ता सरकार यांनी आचार्य अत्रे व बहिणाबाई चौधरी यांचे गीत सादर केले. ह्या सादरीकरण बद्दल शंभू पाटील यांनी सांगितले. आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांनी प्रास्ताविक केले.


माझे वडील शिक्षण मंत्री होते भूगोलाच्या पुस्तकात चूक झाली होती. अत्रे साहेबांनी त्यांच्या पेपर मध्ये खुलासा छापला ह्या बाबत आचार्य अत्रे यांची आठवण सांगितली. आमच्या वडिलांना अत्रे भाचेबुवा म्हणायचे त्यांचा स्नेह आम्हाला लाभला असे आ. शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमात इंद्रायणी सावरकर लिखित ‘महाराष्ट्राचा महासंग्राम’ पुस्तकाचं प्रकाशन कविवर्य महानोर यांच्या हस्ते करण्यात आले.


अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाल्यावर मनोगत व्यक्त केले. महानोर दादा म्हणजे निसर्ग, शेतकरी, रानातली कविता, लोकसाहित्य, निसर्गाशी नाळ जोडून ठेवलेल्या महानोर दादा बद्दल त्यांनी गुणवैशिष्ट्ये सांगितले. दादांना पानझड पुस्तकाला साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला त्यावेळी मोठा सत्कार झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी मिरवणुकीचि बैलगाडी चालवली होती दादांचा हा सत्कार म्हणजे भवरलालजी व महानोर दादा यांच्या मित्रत्वाचा सत्कार होय असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भावे यांनी तर आभारप्रदर्शन राजेंद्र पै यांनी केले. मंजुषा भिडे यांनी म्हटलेल्या वंदे मातरम राष्ट्रगीताने झाला.
चौकट

चक्रवर्ती अशोक भाऊ!

अशोक भाऊ यांना मी चक्रवर्ती म्हणतो. अशोकभाऊ यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान झाला. आज मला भाऊ ची आठवण आली. मला साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला त्यावेळी मी बैलगाडीत बसलो होतो व भवरलालजी जैन धुरकरी होते ते बैलगाडी चालवित होते. आज इलेक्ट्रॉनिक गाडी स्वतः चालवित मला इथे आणले… मला खूप समाधान वाटते असे कविवर्य महानोर म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भव्य मोटारसायकल रॅली;राष्ट्रवादी कडुन उपस्थित राहण्याचे आवाहन

Next Post

गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या युथ रेडक्रॉस शाखेअंतर्गत जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

Next Post

गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या युथ रेडक्रॉस शाखेअंतर्गत जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d