Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कीटकनाशक दुष्परिणामांवर उपचारासाठी अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कीटकनाशक दुष्परिणामांवर उपचारासाठी अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

कोविडच्या अनुषंगाने दक्षता व आवश्‍यक उपचाराबाबत आरोग्य यंत्रणेने सजग रहावे- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव, (जिमाका) दि. 19 – शेतकरी बांधव कीटकनाशकांचा वापर करीत असताना त्याचे होणारे दुष्परिणाम व त्यावर करावयाचे आवश्यक उपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सजग रहावे. जेणेकरून कीटकनाशकापासून विषबाधेसारख्या दुर्घटना टळू शकतील. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी डॉक्टरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.

कृषी आयुक्तालय, कृषी विभाग, पुणे, क्रॉप लाइफ इंडिया व शिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिलीच कीटकनाशकापासूनचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता, उपचार व व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन झाली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. ठाकुर, कृषी उपसंचालक अधिकारी अनिल भोकरे, मेडिकल कौन्सिल अध्यक्ष डॉ. चौधरी, क्रॉप लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व सेन, बायरचे सुशिल देसाई, शिवार फाऊंडेशनचे विनायक हेगाणा आदी उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रशिक्षक तथा केंद्र शासनाचे माजी आरोग्य अतिरिक्त महासंचालक डॉ. देवव्रत कानुंगो यांनी जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त प्राथमिक आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी यांना कीटकनाशकामुळे विषबाधा झाल्यानंतर जिल्ह्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना व कोविड यातील फरक, विषबाधा झाल्यानंतर डॉक्टरांनी करावयाची विविध उपचार पद्धती, औषधांची उपलब्धता याची शास्त्रोक्त माहिती दिली.

कृषी विभागाची शिफारस असो किंवा नसो शेतकरी बांधवांकडून अनेक उत्पादने एकत्र करून रसायने तयार केली जातात. अशावेळी दुष्परिणाम घडल्यास द्यावयाचा अँटी-डोस याविषयी अद्यावत माहिती असावी. तसेच कृषी व आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात याबाबत कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे मुख्य गुणनियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे श्री. सुनिल बोरकर यांनी संबोधित केले. याचबरोबर उस्मानाबाद व यवतमाळ जिल्हय़ातून 1100 पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सेन यांनी प्रस्तावना तर शिवार फौंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी आभार मानले.

कीटकनाशकांमुळे जगात दरवर्षी दोन लाख बळी : डॉ. देवदत्त कानुंगो

कीटकनाशके किंवा तत्सम विविध रसायनांच्या वापरामुळे जगात दरवर्षी दोन लाख मृत्यू होत असल्याची नोंद आहे, असे डॉ. देवव्रत कानुंगो यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कीडनाशकांची सहज उपलब्धता दोन रसायनांचे मिश्रण फवारणीच्या घटना, फवारणीचा लांब कालावधी, संरक्षण किटशिवाय फवारणी, सदोष फवारणी यंत्राचा वापर व योग्य उपचार न मिळणे अशी अनेक कारणे विषबाधेने बळी जाण्यामागे असतात. कीटकनाशकांचे तात्कालिक तसेच दीर्घकालीन दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे सर्वांनीच पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

प्रॅक्टिसिंग नेट-सेट परीक्षा या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न

Next Post
प्रॅक्टिसिंग नेट-सेट परीक्षा या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न

प्रॅक्टिसिंग नेट-सेट परीक्षा या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d