Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जळगाव(जिमाका)- पर्यावरणातील बदल आणि ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिल्यात.मंत्री श्री. भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जामनेर तालुक्यातील काही गावात चार दिवसापूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ओझर येथे घरावरील पत्रा उडून बैलावर पडल्याने बैल गंभीर जखमी झाला होता. मंत्री श्री. भुसे व आमदार किशोर पाटील यांनी आज बैल मालक श्री. रमेश माळी यांची भेट घेतली. पशु वैद्यकीय अधिका-र्यांनी ३० टाके घालुन बैलाचे प्राण वाचविले. बैलाच्या उपचारावर होणारा खर्च शासन करेल असेही त्यांनी सांगितले.यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी ए बी चोपडे यांना नुकसानीचे पंचनामे, तातडीची मदत व पिक विम्याबाबत सुचनाही दिल्यात.

कृषी मंत्री भुसेंची संवेदनशीलत

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे तसे संवेदनशील मनाचे. मग, ते शेतकऱ्याच्या शेतात जावून त्याच्याशी संवाद साधणे असो, शेतकऱ्यांसोबत नांगरणी, पेरणी असो वा शेतमजुराच्या चंद्रमौळी झोपडीत जावून झुणका- भाकरीचा आस्वाद घेणे असो. अशा प्रत्येक घटनेतून कृषी मंत्री श्री. भुसे यांचे संवेदनशील मन दिसून येते.अशीच आणखी एक घटना आज दुपारी घडली. जामनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात घरावरील पत्रे उडून बैल जखमी झाला होता. या बैलाला पशुवैद्यकांनी 30 टाके घालून त्याचे प्राण वाचविले. ही घटना आज चाळीसगाव, भडगाव आणि पाचोऱ्याच्या दौऱ्यावर असलेल्या श्री. भुसे यांना समजली. हा दौरा संपल्यानंतर त्यांनी तेथूनच ओझर, ता. जामनेर येथे जाण्याचे ठरविले. या भागातील नुकसानीची पाहणी करून ते थेट बैल मालक शेतकरी रमेश भगवान माळी यांचे घर गाठले. तेथे त्यांनी या बैलाच्या प्रकृतीची माहिती शेतकरी श्री. माळी यांच्याकडून घेतली. तसेच या बैलाच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगत शेतकरी श्री. माळी यांना दिलासा दिला.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रभाग क्रमांक १६ मधील लसीकरण शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद; १२६५ इतके विक्रमी लसीकरण

Next Post

पर्यावरण रक्षणासाठी निसर्गप्रेमींनी अधिकाधिक योगदान द्यावे -राज्यपाल

Next Post
पर्यावरण रक्षणासाठी निसर्गप्रेमींनी अधिकाधिक योगदान द्यावे -राज्यपाल

पर्यावरण रक्षणासाठी निसर्गप्रेमींनी अधिकाधिक योगदान द्यावे -राज्यपाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d