Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केशवस्मृतीतर्फे पोषण अभियान संपन्न; १९७ स्तनदा माता व गरोदर महिलांना पोषण किट वितरण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
केशवस्मृतीतर्फे पोषण अभियान संपन्न; १९७ स्तनदा माता व गरोदर महिलांना पोषण किट वितरण

जळगांव(प्रतिनिधी)- केशवस्मृती प्रतिष्ठान आणि ग्लोबल सिनर्जाइझर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या पोषण अभियानात १९७ गरजू आणि आदिवासी पाड्यावरील महिलांना पोषण किटचे वितरण करण्यात आले.

यात गरोदर तसेच स्तनदा मातांचा समावेश होता. बहुतेकवेळा ग्रामीण भागात महिलांच्या सर्वसाधारण आरोग्याकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षित शारीरिक विकासही अनेकदा खुंटलेला आढळतो. यासोबतच गरोदर आणि स्तनदा मातांना जो अतिरिक्त पोषण आहार द्यायला पाहिजे त्याकडेसुद्धा दुर्लक्ष केले जाते. त्याचा परिणाम ही माता किंवा महिला कुपोषित राहण्यात जसा होतो तसेच तिचे अपत्यही कुपोषित जन्म घेण्यात होऊ शकतो. हे टाळण्यासाठीच मुख्यत्वे या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून यावल आणि रावेर या दोन तालुक्यातील मालोद, वाघझीरा, मानापुरी, गायरान, इचखेडा, खालकोट , कोळवद, डोंगरदे, रावेर, आभोडे या गावांचा या पोषण किट वितरण अभियानात समावेश होता.शासनातर्फे अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा पोषण आहार हा दैनंदिन स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तूंच्या स्वरूपात असतो. त्यामुळे केवळ गरोदर, स्तनदा मातांना हा लाभ न मिळता घरातील सर्व सदस्यच त्याचा लाभ घेतात. शिवाय ज्यांना असा आहार अधिक मिळणे अपेक्षित असते त्यांनाच तो मिळत नाही. साधारणपणे एक किंवा दोन महिन्यांसाठी असणारा हा आहार ८- १५ दिवसातच संपतो.

त्यानंतर ही महिला पोषण आहारापासून वंचित असते. ही समस्या डोळ्यासमोर ठेवून तसेच गरजू महिलांना आवश्यक असलेल्या घटकांचा पोषण आहार मिळावा असा याद्वारे प्रयत्न आहे.यात सोयाबीन वडी, सातू पीठ,नाचणी पीठ, तसेच तूर, मसूर, मूग या डाळींचे एकत्रित पीठ व एक किलो खजूर अशा वस्तूंचे किट दोन महिने पुरेल इतके तयार करण्यात आले आले. या वस्तूंचे पीठ तयार करून दिल्यामुळे गरजू महिलाच उपयोग करू शकतील असा, विश्वास आहे. वितरण करतेवेळी हे तयार करण्याची रेसिपीही समजावून सांगण्यात आली.

या अभियानास त्या त्या गावातील अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले. या अभियानासाठी चाईल्ड लाईनचे समन्वयक भानुदास येवलेकर, समुपदेशिका वृषाली जोशी, टीम सदस्य कुणाल शुक्ल, रोहन सोनगडा, संजीवनी सावळे, प्रसन्न बागल, सामाजिक कार्यकर्ते चैताली पाटील, शिवानी महाजन, नेहा कारोसिया यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

डाक विभागात खेळाडूंसाठी भरती; शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन

Next Post
डाक विभागात खेळाडूंसाठी भरती; शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन

डाक विभागात खेळाडूंसाठी भरती; शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d