Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळात अनेक नागरिकांना/रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध न होणे, इंजेक्शनचा तुटवडा आदि समस्या भेडसावत आहे. आजही कोविडचे बरेचसे रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध व्हावे या दृष्टिने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णांसाठी ७ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत.
या मशिनचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री प्रेम कोगटा, श्री संजय बिर्ला, श्री संजय नारखेडे, डॉ. नितीन चौधरी, डॉ. धर्मेंद्र पाटील, रा.स्व. संघाचे देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख श्री स्वानंद झारे, प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री योगेश्वर गर्गे, श्री रत्नाकर पाटील, श्री सचिन चोरडिया, श्री नंदू अडवाणी, श्री शरद कोत्तावार, श्री भानुदास येवलेकर, श्री हेमंत भिडे, श्री सागर येवले उपस्थित होते.
सदरची मशीन केशवस्मृतीच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे त्यांनी रुग्णास ऑक्सिजन ची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजन ची गरज आहे त्याचा तपशील, ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील, मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर केशवस्मृतीस परत करावयाचे आहे.
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी मुंबई स्थित सेवा इंटरनॅशनल व पुणे येथील मुकुल माधव फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरज असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रोहन सोनगडा (९९२१४७२७६६) किंवा केशवस्मृती प्रतिष्ठान ०२५७ २२३६१६६/६९ येथे संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) च्या गव्हर्निंग कौन्सिल सुधारित कार्यकारणी जाहीर

Next Post

मागासवर्गीयांसाठीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा -बानाई

Next Post

मागासवर्गीयांसाठीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा -बानाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d