Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनचे पालन करावे-गृहमंत्री अनिल देशमुख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनचे पालन करावे-गृहमंत्री अनिल देशमुख


जळगाव,(जिमाका) दि. 28 – कोरोनाची साखळी तोडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे नागरीकांनी लॉकडाऊनच्या काळात शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याची कोरोनाचा परिस्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री यांनी आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रांताधिकारी दिपमाला चौरे, ॲङ रविंद्र पाटील, अभिषेक पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गृहमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, देशाबरोबरच राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून जे रुग्ण कोरोना बाधित आढळून येतील त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तातडीने घेऊन त्यांना सामाजिक क्वारंटाईन करावे. बाधित रुग्ण ज्या भागातील रहिवासी असेल त्या भागास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्याची तपासणी प्राधान्याने करुन घ्यावी. त्या भागातील नागरीकांना परिस्थितीची कल्पना देऊन घरातच राहण्याचे आवाहन करण्यात यावे. त्याचबरोबर पुढील महिन्याच्या धान्याचे वाटप करतांना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. धान्यवाटपाचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. निवारागृहात असलेल्या परप्रांतीय मजूरांबाबत राज्यस्तरावरुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्व मजूरांची व्यवस्थित काळजी घेण्याच्याही सुचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात.
सध्या शेतीचा खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते यासाठी तातडीने पैशांची आवश्यकता असल्याने सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेली रक्कम एकरक्कमी रोखीने देण्यात यावी. जेणेकरुन त्यांना वारंवार रक्कम काढण्यासाठी एटीएमला यावे लागणार नाही अशी सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली.
बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थतीची माहिती दिली. जिल्ह्यातील अमळनेर व भुसावळ तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यात अन्नधान्याची कुठलीही अडचण नाही. त्रिस्तरीय रचनेनुसार जिल्ह्यात 8 हजार बेड तयार करण्यात आले असून 24 हजार बेड तयार करण्याचे नियोजन आहे. मालेगांव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने धुळे येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने जळगावच्या संशयितांचे नमुने अकोला प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे प्रशासनाचे नियोजन असून जिल्ह्यासाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. प्रयोगशाळेसाठी निधीची कुठलीही अडचण नाही. फक्त मशिनरी येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे त्यातच जिल्ह्यातील 100 पोलीस मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले आहेत. सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने पोलीस विभागाच्या मदतीला रेल्वे पोलीस फोर्सची मदत घेता येईल अशी सुचना पोलीस अधीक्षक डॉ उगले यांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने २५० सॅनिटायजर व ५०० मास्कचे वाटप

Next Post

लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ उपक्रम-जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

Next Post
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ उपक्रम-जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d