Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाचे संकट आणि नागरवस्तीवर होणारे परिणाम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2020
in लेख
Reading Time: 1 min read
कोरोनाचे संकट आणि नागरवस्तीवर होणारे परिणाम

आज जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे , चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेले कोरोनाचे दुष्टचक्र जगभर पसरले आणि जगातील अनेक देशांना आपल्या कवेत घेत करोडो लोकांचे जनजीवन विस्कळीत करून हजारोंच्या संख्येने लोकांचे बळी घेतले आहे , जर जागतिक पातळीवर विचार केला तर , या कोरोनाने आतापर्यंत जगात 2,923,285 लोक कोरोनामुळे बाधित झाले आहेत , ज्यात 203,308 लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत व साधारण 837,531 लोकांना उपचारांती बरे करून घरी सोडण्यात आले आहे , या आकडेवारी वरून या कोरोना महामारीची व्याप्ती लक्षात येते की , हा कोरोना आजार किती भयंकर आणि धोकादायक आहे , जो खूप वेगाने वाढत आहे .जर या महामारीचा भारतीय संदर्भात विचार केला तर , या कोरोना महामारीने भारतालाही सोडले नाही , कारण भारतात आजपर्यंत 19,868 लोकांना कोरोना संसर्ग झाले असून , त्यात 824 जण मृत्यूमुखी पडले आहे आणि जे उपचार घेऊन बरे झालेत घरी सोडण्यात आले व त्यांची संख्या 824 आहे . जर हीच आकडेवारी महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून पाहिली तर , आतापर्यंत महाराष्ट्र एकूण 7628 लोकांना कोरोनाची लागण झाली असून , ज्यात 1076 लोकांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे व 323 लोकांचा आजतागायत मृत्यू झाला आहे , म्हणजेच कोरोना महामारी झपाट्याने वाढत असून तीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात अनेक शहरात होताना दिसत आहे .आपण माध्यमातून येणारे आकडे किंवा आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या माहिती तपासली तर असे लक्षात येते की , हा कोरोना आजार मोठ्या प्रमाणात शहरी भागात वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे , ज्यामध्ये विशेषतः महानगर क्षेत्र यांचा समावेश होतो , ज्यात मुंबई , पुणे , नाशिक , ठाणे , नागपूर , मालेगाव , पालघर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या शहरी भाग आणि झोपडपट्टी किंवा नागरवस्तीचा समावेश होतो , या ठिकाणी कोरोना आजार पसरणे किंवा संक्रमण होऊन याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आणि धोका जास्त आहे . कारण आपण शहरी भागाचा आणि झोपडपट्टी किंवा नागरवस्तीचा विचार केला तर , आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी दाटीवाटीने राहणारे लोक जास्त प्रमाणात असतात , इथे पुरेशा सूर्यप्रकाश जात नसतो , लोकांच्या घरात खेळती हवा नसते , एकाच कुटुंबात अनेक लोक राहत असतात , यामध्ये वस्तीतील घरांचा आकार हा लहान असल्याने त्यांची घरे एकमेकांना चिटकून अथवा खेटून असतात , वस्तीत पुरेशी मोकळी जागा नसल्याने लोकांना फिरायला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते , त्यातही सार्वजनिक सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांची गैरसोय होते , यामध्ये अनेक साथीचे आजार आणि रोगांचा अस्तित्व असल्याने लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते , ज्यामुळे त्यांची परवड होत असते , त्यात ही वस्तीतील किंवा शहरी भागातील लोकांना टॉयलेट्ससाठी सार्वजनिक शौचालय वापराशिवाय दुसरा पर्याय नसतो व लोक त्यानिमित्ताने एकत्रित जमतात , म्हणून इथे वस्तीतील लोकांना कोरोनासंकट आणि त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे .आपण जर वरील सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला तर , आपल्या लक्षात येते की वस्तीत किंवा शहरी भागातील लोकांना आधीच अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे , अशातच कोरोनो आजाराने झोपडपट्टी किंवा नागरवस्तीत शिरकाव केला तर , या कोरोनो महामारीचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होवून त्याचा प्रादुर्भाव वाढतच जाणार , कारण इथल्या लोकांना शारीरिक किंवा सामाजिक अंतर ठेवणे कठीण आहे , तसेच वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता राखणेपण मुश्कील आहे व त्यांना सतत पाण्याचा वापर करणे व्यवहारिकदृष्ट्या शक्य नाही , तसेच कुपोषण , क्षयरोग , सिजनल आजार , एचआईव्ही/एड्स , मोतिबिंदू , स्किन डिजीस आदी आजारांनी लोक आधीच हैराण आणि परेशान झाल्याने त्यात कोरोनो सारख्या महामारीने थैमान घालून भर घातली आहे .सध्या देश कठीण प्रसंगातून आणि संकटकाळीन परिस्थितीतुन जात असताना देखील , आज ही समाजातील काही मूर्ख लोक किंवा धर्मांध लोक यामध्ये धार्मिक रंग देऊन व धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या नादात सामाजिक स्वास्थ्य आणि सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत , जे अत्यन्त निंदादायक आणि संतापजनक प्रकार आहे . कारण या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन व एकजुटीचे दर्शन घडवून कोरोना महामारीचा मुकाबला करणे आवश्यक आहे , जर दुसरीकडे आपले सरकार , प्रशासन , आरोग्य यंत्रांना , पोलीस यंत्रणा , सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था व संघटना आणि व्यक्ती , सफाई कामगार आदी लोक अहोरात्र काम करून आपल्यासाठी झटत आहे , जेणेकरून हा कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयन्तशील आहेत , परंतु असे असताना देखील काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत जे की क्लेशदायक आणि चिंताजनक बाब आहे .असे असेल तरी या कठीण काळात आपण सर्वांनी एकजूट दाखवून मानवता धर्म जपत माणुसकी झोपासली पाहिजे , कारण हा कोरोना आजार कोणतेही जात , धर्म , पंत , लिंग किंवा वर्ण पाहून होत नाही , तर आपल्या गैरवर्तुणुकीतून आणि निष्काळजीपणे वागण्यातून होत आहे , कारण लॉक डाउनमुळे लोकांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे , अशा प्रसंगी लोकांना मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज आहे , म्हणून शक्य असल्यास लोकांना मदतीचा हात पुढे करत सहकार्य करा , जेणेकरून या कोरोनाच्या लढाईत आपल्या सर्वांना विजय मिळवता येईल आणि आपले जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल व सर्व सामान्य जीवन जगता येईल ही अपेक्षा करूया आणि कोरोनाला मात देऊया .

लेखक-सुनिल लक्ष्मण शिरीषकरपीएच.डी.स्काँलर( टी.आय.एस.एस.)महासचिव महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु )मो.नं.-८०९७५८५३०४

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बाज. आर. आर. हॉस्पिटल वर केलेल्या तक्रारींबद्दल पालिकेने सादर केला वस्तुस्थिती अहवाल

Next Post

निधन वार्ता; भागवत रावजी पाटील

Next Post
निधन वार्ता; भागवत रावजी पाटील

निधन वार्ता; भागवत रावजी पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d