Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पाच लाखाचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पाच लाखाचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण दहा अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासनाने जाहिर केलेल्या पाच लाखाच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्वश्री आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार,डॉ. राहुल आहेर,सरोज अहिरे,जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ.सुशील वाघचोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे उपस्थित होते.

कोरोना संसर्गात ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहे, अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी व संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे आवश्यक होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील जवळपास 38 बालकांना महिला व बाल विकास विभागामार्फत पाच लाखाच्या मुदतठेव प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

आरोग्य शिक्षण संवाद संपर्क पुणे विभागाचे सन्मान चिन्हांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण कोरोना महामारीत साथरोग नियंत्रणासठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संचालक आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण संवाद संपर्क विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त सन्मान चिन्हाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य परिमंडळाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.सुशील वाघचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, सरिता खैरे, अर्चना जोशी, प्रशांत केळकर आणि सुरेश जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

Next Post

‘बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Next Post
‘बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

‘बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d