Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

सोलापूर, दि. 11 : सोलापूर शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.

Maha Info Corona Website

सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री श्री.भरणे यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले की, सोलापूर शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करा. यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार यातील कालावधी कसा कमी करता येईल यावर भर द्या. राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ.दिलीप कदम यांनी नुकतीच सोलापूर शहराला भेट दिली आहे. त्यांनी सोलापुरातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनावर अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राज्याच्या पथकातील विशेष तज्ञ डॉक्टर बोरसे यांना संपर्क करून मृत्यूदर कमी करण्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करा. इतर जिल्ह्यात काय उपचार सुरू आहेत. तेथे काही नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविल्या जात आहेत का, याची माहिती घ्या. 

बैठकीत मद्यविक्री सुरू करण्याबाबत चर्चा झाली. यावर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित विचार करून त्याबाबत निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.  कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थाविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

पोलीस शिपाई परचंडे यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

सोलापूर,  दि. 11 : कोविड-19 अनुषंगाने कर्तव्य बजावत असताना मृत झालेले  पोलीस शिपाई रामेश्वर गंगाधर परचंडे यांच्या कुटुंबियास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

कर्तव्यावर असताना श्री.परचंडे यांचे 22 मे 2020 रोजी निधन झाले होते. त्यांच्या परिवारास पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत विशेष सहायता निधी मंजूर झाला होता.  तो निधी पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते  परचंडे यांच्या पत्नी नम्रता परचंडे, आई सुमन परचंडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

Next Post

लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d