Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागात आरोग्य सुविधांचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – कोरोना व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर या आदिवासी भागातील नागरीकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नवसंजीवनी योजनेची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडली यावेळी त्यांनी या सूचना दिल्यात. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, आदिवासी विकास विभाग यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तडवी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, भाऊसाहेब अकलाडे, श्री. तडवी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हा‍धिकारी श्री. राऊत म्हणाले की, कोरोना बाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळून येत असून आगामी काळात पावसाळाही सुरु होईल. याकरीता आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे मनुष्यबळ, औषधे व इतर सोयीसुविधा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. याकरीता आवश्यक ते नियोजन करावे. नवसंजीवनी योजनेतील लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. या भागातील नागरीकांना घर तेथे जॉबकार्ड व जॉबकार्ड तेथे काम या तत्वावर कामांचे वाटप करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या डिलीव्हरीची पूर्ण व्यवस्था होईल यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनातंर्गत लहान मुलांचे लसीकरण होईल याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील रुग्णवाहिका सुस्थितीत राहील याची दक्षता घेण्याबरोबच स्तनदा मातांना आवश्यक आहार व गरोदर मातांना मातृत्व अनुदानाचे लवकरात लवकर वाटप करण्याच्या सुचनाही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात.
या भागातील आरोग्य केंद्रात मनुष्यबळ व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच निमड्या व देवजीरी येथील आरोग्य उपकेद्रांची इमारतीचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करुन तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणांना दिल्यात.
यावेळी उंबर्डी, लासूर, वैजापूर, जामन्या, गारडया, निमड्या या आरोग्य उपकेंद्रातील अडीअडचणी व आवश्यक सुविधा तसेच रोहयो अतंर्गत आदिवासी भागातील नागरीकांना जास्तीत जास्त कामे उपलब्ध करुन देण्याबाबत प्रतिभा शिंदे यांनी विविध सुचना मांडल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यात 24 हजार रुग्णांवर उपचार;योजनेत म्युकरमायकोसिस आजारावर होणार मोफत उपचार

Next Post

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या २३ रुग्णांवर उपचार सुरु ;दोन दिवसात ८ ते १० शस्त्रक्रिया

Next Post
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या २३ रुग्णांवर उपचार सुरु ;दोन दिवसात ८ ते १० शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या २३ रुग्णांवर उपचार सुरु ;दोन दिवसात ८ ते १० शस्त्रक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d