Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान, पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्यातर्फे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021- 2022 करीता उपलब्ध अनुदानांतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडांगण विकास अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम या योजनेंतर्गत येणाऱ्या अनुसुचित जमाती ( एसटी) संवर्गासाठी कार्यरत व शासनाने आदिवासी घटक कार्यक्रम या योजनेंतर्गत येत असलेल्या गावांसाठी सर्व शासकीय, संस्था संचलित अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे आदी ज्यांना शिक्षण विभाग, समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे, अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महनगरपालिका आदींना अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदानित शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास 1.5 एकर किंवा यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदाने तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतात.

या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मीटर अथवा 400 मीटर धावन मार्ग तयार करणे, क्रीडांगण्णास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे, प्रसाधान गृह/चेजिंग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाइटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलिंगसाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसांठी क्रीडा उपक्रमांची आवश्यकता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येईल.

वरील बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येईल. वर उल्लेखीत प्रत्येक बाबींकरीता (प्रस्ताव एकाच बाबींकरीता करावा) अंदाजित खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल सात लाख रुपयांपर्यंतचे अनुदान या पैकी जी रक्कम कमी असेल एवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. क्रीडा साहित्यासाठी कमाल तीन लाख रुपये अनुदान मर्यादा राहील. क्रीडा साहित्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे यांच्याकडे मैदाने / हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी पात्र संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव 8 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा विहीत नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे 8 ऑक्टोबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधत त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईन ( On Line) Jalgaonsports.in या संकेतस्थळावर सादर करावा. अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मूळ कागदपत्रांसह प्रस्ताव आवश्यक कागदपत्राच्या पूर्ततसह सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असेही जिल्हा क्रीडाधिकारी श्री. दीक्षित यांनी नमूद केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसह एमएचटी- सीईटी परीक्षेसाठी मनाई आदेश

Next Post

निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी वाणिज्य उत्सवाचे आयोजन

Next Post
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी वाणिज्य उत्सवाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d