Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खेळाडूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील -क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
खेळाडूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील -क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

KOLKATA, WEST BENGAL, INDIA - 2017/09/02: Bengal Worriers (blue jersey) and UP Yoddha (brown jersey) players in action during the Pro Kabaddi League match on September 2, 2017 in Kolkata. (Photo by Saikat Paul/Pacific Press/LightRocket via Getty Images)

नागपूर(प्रतिनिधी)- खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. नागपुरात येत्या जानेवारीत आंतरराष्ट्रीय युथ फेस्टिव्हल नियोजित आहे. तसेच सध्या कोरोना संसर्ग कमी होत असून क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

वेळाहरी बेसा येथे श्री स्वामी समर्थ स्पोर्टस् अँड वेलफेअर असोसिएशनच्या ॲचिव्हर्स बॅडमिंटन क्लबचे उद्घाटन आज श्री. केदार यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा परिषद सदस्य मेघा मानकर, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव मंगेश काशीकर, दिनकर कडू, संजय कांडगावकर, बेसाचे सरपंच सुरेंद्र बानाईत, वेळाहरीचे सरपंच सचिन इंगोले, क्लबचे अध्यक्ष अजय दोनोडे, उपाध्यक्ष संजय चरडे उपस्थित होते.

खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होवून व्यक्तिमत्व घडते. सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आजही अनेक क्रीडा प्रकारातील प्रशिक्षक, विविध तज्ज्ञ परदेशातून बोलवावे लागतात. या क्षेत्रात करिअरच्या संधी असून युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

ज्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील अभियंते करिअरसाठी जगभरात पोहचले, त्याप्रमाणेच या विद्यापीठात घडलेले प्रशिक्षक, तज्ज्ञ भविष्यात देशात, परदेशात जावून करिअर करतील, असा विश्वास श्री. केदार यांनी यावेळी व्यक्त केला. ॲचिव्हर्स बॅडमिंटन क्लबमुळे ग्रामीण भागात चांगले खेळाडू घडण्यास मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले.खासदार श्री. तुमाणे, श्री. काशीकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

१२ व्या राज्यस्तरीय “क्रिएटीव टच” चित्रकला स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे समीर मळेकर यांचे आवाहन

Next Post

खेळाडूंनी क्रीडा संकुलातून मार्गदर्शन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करावे -मंत्री एकनाथ शिंदे

Next Post
खेळाडूंनी क्रीडा संकुलातून मार्गदर्शन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करावे -मंत्री एकनाथ शिंदे

खेळाडूंनी क्रीडा संकुलातून मार्गदर्शन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करावे -मंत्री एकनाथ शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d