Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर;अन्वी जयभाये, निकिता गावडे, शुभम पाटील प्रथम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2020
in विशेष
Reading Time: 2 mins read

जळगाव (दि.14) प्रतिनिधी:- कोरोना वैश्विक महामारीच्या प्रसंगानुसार गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘बा-बापू 150’ जयंती वर्ष अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली. गांधीजींचे विचार नव्या पिढीमध्ये संस्कारित व्हावे; यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत भारतासह विविध देशांतून 2000 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम गटातून अन्वी प्रभाकर जयभाये (अकोला), द्वितीय गटातून निकिता दत्तात्रय गावडे (पुणे), तृतीय गटातून शुभम रंगराव पाटील (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटवकाविला.

कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम घेतले जात असतात. शैक्षणिक, वैचारिक, सामाजिक, पर्यावरण संतुलन, आरोग्य विषयक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. महात्मा गांधी यांनी भारतच नाहीतर संपुर्ण विश्वात स्वत:चे विचार आणि कृतिशिल आचरणातून आदर्श निर्माण केला आहे. महात्मा गांधीजी यांचे विचार पुढील पिढीमध्ये संस्कारित झाले पाहिजे या उद्देशाने ऑनलाईन राष्ट्रीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मातृभाषेत गांधीजींच्या विचारांचे मंथन केले. स्पर्धेत मुलांपेक्षा मुलींनीचा सहभाग उल्लेखनिय होता.

तीन गटात घेण्यात आली स्पर्धा

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम गटासाठी ‘गांधी माझे हिरो’, द्वितीय गटासाठी ‘आज गांधीजी असते तर काय करते?’ आणि तृतिय गटासाठी ‘अहिंसेचे जीवनातील नियम’ हे विषय घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने भाषा निवडून व्हिडोओ करित गांधी रिसर्च फाऊंडेशनकडे पाठवायचे होते. ही स्पर्धा तीन गटामध्ये आयोजित केली होती. प्रथम गटामध्ये इयत्ता 5 वी ते 8 वी, दुसरा गट 9 वी ते 12 वी तर तृतिय गटामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओरिसा आदी राज्यांमधील स्पर्धेक सहभागी झाले होते. गुजरात विद्यापिठामध्ये शिक्षण घेत असलेल्या झांबिया देशातील विद्यार्थ्यांनीसुद्धा सहभाग घेतला. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोजक्या व्हिडिओ मधील काही व्हिडीओ गांधी तीर्थच्या सोशल मिडाया फेसबुक व यु ट्यूब वर प्रसारित केले होते. याला देश-विदेशातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दोन लाख लोकांनी साईडवर जाऊन व्हिडीओ बघितले तर जवळपास 60 हजाराच्यावर लोकांनी लाईक केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सोशल मीडिया पेज https://www.facebook.com/gandhiteerth/live/याhttps://youtu.be/AUJHAHP-ImAवर व्हिडोओ पाहता येतील.

हे आहेत विजेते

प्रथम गटामध्ये अन्वी प्रभाकर जयभाये (इयत्ता 5वी, प्रतिभा किड्स स्कूल, अकोला) हीने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकाने प्रगती प्रदीप गोंदकर (इयत्ता 8वी, सिल्व्हर महोत्सवी विद्यालय, बार्शी), तर तृतीय क्रमांकाने मुग्धा विजय याज्ञिक (इयत्ता 5वी, प्रताप विद्यामंदिर, चोपडा) विजयी झालेत. दुसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांकाने निकिता दत्तात्रय गावडे (इयत्ता 10वी, गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे), द्वितीय क्रमांकाने एम. आयशा सामिहा (इयत्ता 9 वी, लिटल फ्लॉवर पब्लिक स्कूल, तिरूनेलवेली तामिळनाडू), तृतीय क्रमांकाने विष्णुप्रिया सक्सेना (इयत्ता 12वी, दयावती मोदी अकादमी, मोदीपुरम मेरठ) तर महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांकाने शुभम रंगराव पाटील (पुणे), द्वितीय भक्ती अरविंद देशमूख (पुणे), तृतीय क्रमांकाने निकिता कुमारी (कुरूक्षेत्र, हरियाणा) हे विजयी झाले. अंतिम विजेत्यांची घोषणा प्रोफेसर जी. व्हि. व्हि. प्रसाद, प्रो. जी. पालाणीथूराई, के. एम. नटराजन यांनी केली.

चार सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या व्हिडिओचे परिक्षण करण्यात आले. तंत्रज्ञान संबधित विषयाची तपासणी, वकृत्वासाठी घेतलेल्या विषयाची जाणिव, तत्व आणि नैतिकतेबाबतची तपासणी यानंतर परिक्षकांच्या परिक्षणातून अंतिम निकाल देण्यात आला. परिक्षक म्हणून गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, प्रा. विश्वास पाटील यांनी न्यायपूर्ण परिक्षण केले. तर प्राथमिक परिक्षण ज्ञानेश्वर शेंडे, हर्षल पाटील यांनी केले. सौ. अंबिका जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, गांधी रिसर्च फाउंडेशनमधील शिक्षण विभागाचे डीन डॉ. जॉन चेल्लादूराई, प्रा. अश्विन झाला, नितीन चोपडा, सुधीर पाटील यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समन्वय साधला. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे चंद्रशेखर पाटील, कु.योगिता चौधरी, अशोक चौधरी, विश्वजित पाटील, दुर्वास नलगे, अनुभूती स्कूलचे पार्वती गोस्वामी आणि हुसेन भाई यांनीही सहकार्य केले. तंत्रज्ञानासंबधी योगेश संधानशिवे, जगदिश चावला, भूषण मोहरिर, चेतन पाटील आणि हिमांशू पटेल यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मयूर वाघ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर

Next Post

अल्पसंख्याक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

अल्पसंख्याक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d